रिओ डी जनेरियो X banned in Brazil :ब्राझीलमध्ये X वर बंदी घालण्याच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात ऑनलाइन सुनावणी झाली. यात खंडपीठातील 11 न्यायाधीशांपैकी पाच न्यायाधीशांचा समावेश होता. त्यात न्यायाधीश डी मोरेस यांचाही समावेश होता.
X वर बंदी घालण्याचे आदेश :कायद्यानुसार आवश्यक असलेल्या स्थानिक कायदेशीर प्रतिनिधीचे नाव उघड करण्यास नकार दिल्याबद्दल मोरेस यांनी गेल्या शुक्रवारी X वर बंदी घालण्याचे आदेश दिले. माहितीनुसार, कोर्टाच्या आदेशाचं पालन करेपर्यंत आणि थकित दंड भरेपर्यंत X वर बंदी कायम राहील. थकबाकी दंडाची रक्कम US$3 दशलक्ष पेक्षा जास्त आहे. गेल्या आठवड्यात न्यायाधीश डी मोरेस यांनी आपल्या निर्णयात म्हटलं, की इलॉन मस्क यांनी ब्राझीलच्या सार्वभौमत्वाचा आणि विशेषत: न्यायव्यवस्थेचा पूर्ण अनादर दर्शविला आहे. मस्क आणि त्यांच्या समर्थकांनी न्यायमूर्ती अलेक्झांड्रे डी मोरेस यांना हुकूमशाही धर्मद्रोही म्हणून कास्ट करण्याचा प्रयत्न केला होता.
सात लाख रुपयांपेक्षा जास्त दंड :दूरसंचार नियामक अनाटेलला निलंबनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. 24 तासांच्या आत कोर्टाला त्याची अंमलबजावणी करून त्याची प्रत सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. ज्या व्यक्ती किंवा कंपन्यांनी व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कचा (व्हीपीएन) वापर केल्यास अशा त्यांना 50 हजार रियाल (सुमारे 7.47 लाख रुपये) पर्यंत दंड होऊ शकतो.
बंदी आदेश :या वर्षाच्या सुरुवातीला, मोरेसन यांनी X ला द्वेष पसरवल्याचा आरोप असलेली तथाकथित डिजिटल खाती बंद करण्याचे आदेश दिले होते. मस्क यांनी सेन्सॉरशिप म्हणून या आदेशाच निषेध केला होता. तसंच ब्राझीलमधील प्लॅटफॉर्मची कार्यालये बंद केली होती. पूर्वी ट्विटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या X नं त्यावेळी सांगितलं की, त्याच्या सेवा अजूनही ब्राझीलमध्ये उपलब्ध असतील.
हे वचालंत का :
- अनधिकृत ॲप्सकडून घेतलेलं कर्ज पडतंय महागात? अशी करा कर्जातून सुटका - Borrowing from unauthorized apps
- स्मार्टफोनवर गेम खेळण्याची खूप आवड आहे? घ्या 'हे' बेस्ट गेमिंग स्मार्टफोन - Best gaming smartphone
- अंतराळात गेल्यावर शरिरावर काय होतो परिणाम? - space travel