महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये 'या' कार झाल्या सादर? जाणून घ्या A टू Z माहिती - BHARAT MOBILITY GLOBAL EXPO 2025

Bharat Mobility Global Expo 2025 मध्ये Vitara EV, Hyundai Creta, Tata Harrier, Tata Sierra, Tata Avinya X, MG Cyberster, Kia EV6 फेसलिफ्ट सादर झाल्या आहेत.

Vitara EV, Hyundai Creta, Tata Harrier, MG Cyberster EV,
सुझुकी विटारा ईव्ही, ह्युंदाई क्रेटा, टाटा हॅरियर, एमजी सायबरस्टर ईव्ही, (Suzuki, Hyundai, Tata, MG)

By ETV Bharat Tech Team

Published : Jan 18, 2025, 12:35 PM IST

हैदराबाद : भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये पहिल्याच दिवशी इलेक्ट्रिक वाहनांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी विविध कार कंपन्यांनी त्यांच्या ईव्ही कार एक्सपोत सादर केल्या. पहिल्याच दिवशी, मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटर इंडिया, टाटा मोटर्स, मर्सिडीज बेंझ, किआ आणि एमजी यासह अनेक कार कंपन्यांनी त्यांच्या ईव्हीचं सादरीकरण केलं. यावेळी मारुती सुझुकीची इलेक्ट्रिक विटारा पाहण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली. क्रेटा ईव्ही देखील यावेळी सादर करण्यात आली होती.

Maruti Suzuki Electric Vitara
इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोच्या पहिल्या दिवशी, देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीनं त्यांची बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक एसयूव्ही ई-विटारा सादर केली, जी दोन बॅटरी पॅकसह सादर करण्यात आली आहे. कंपनीनं या ई विटाराचं संकल्पना मॉडेल ऑटो एक्स्पो 2023 मध्ये मारुती ईव्हीएक्स या नावानं प्रदर्शित केलं आहे. कंपनीनं मारुती ई विटारामध्ये अनेक प्रमुख अपडेट्स दिलं आहेत, नवीन डिझाइनपासून ते वैशिष्ट्यांपर्यंत तिच्यात बदल दिसून येत आहे.

बॅटरी पॅकसह रेंज
कंपनीनं मारुती ई विटारा दोन बॅटरी पॅकसह सादर केली. पहिला बॅटरी पॅक 49 किलोवॅटचा असून दुसरा बॅटरी पॅक 61 किलोवॅटचा आहे. कंपनीचा दावा आहे की ही इलेक्ट्रिक विटारा एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 500 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज देईल.

मारुती ई-विटाराची पॉवर
मारुती ई विटाराच्या पॉवरबद्दल बोलायचं झालं तर, सिंगल मोटरसह 49 किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक 144 एचपी पॉवर जनरेट करतो. तसंच सिंगल-मोटरसह मोठा 61 किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक 174 एचपी पॉवर जनरेट करतो. या दोन्ही बॅटरी प्रकारांमधून निर्माण होणारा पीक टॉर्क 189 एनएम आहे.

ई विटाराची रचना
ई विटाराची डिझाइन ऑटो एक्स्पो 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या मारुती ईव्हीएक्ससारखीच आहे. ज्यामध्ये काही अपडेट्स देण्यात आले आहेत. यात पुढील आणि मागील बाजूस ट्राय-स्लॅश एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, फ्रंट कॉर्नर समाविष्ट आहेत.

Hyundai Creta Electric
दक्षिण कोरियाची कार उत्पादक कंपनी Hyundai नं त्यांची नवीन इलेक्ट्रिक SUV Hyundai Creta EV सादर केली आहे. दिल्लीतील प्रगती मैदानावर (भारत मंडपम) येथे आयोजित भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये ही एसयूव्ही सादर करण्यात आली. तिची किंमत 19.19 लाख रुपयांपासून सुरू होते.

लूक डिझाइन
डिझाइनच्या बाबतीत, ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक तिच्या आयसीई-चालित (पेट्रोल-डिझेल) मॉडेलसारखीच दिसते. यामध्ये पिक्सेलसारख्या डिटेलिंगसह नवीन फ्रंट आणि रियर बंपर देण्यात आला आहे. याशिवाय, इलेक्ट्रिक कारसारखे पारंपारिक झाकलेले फ्रंट ग्रिल यात आहे. त्यात नवीन एरो-ऑप्टिमाइज्ड अलॉय व्हील्स समाविष्ट करण्यात आले आहेत. कारच्या आतील बाजूस, क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये ड्युअल 10.25 इंच स्क्रीन सेटअप आहे. याशिवाय, जागतिक बाजारात उपलब्ध असलेल्या कोना इलेक्ट्रिकपासून प्रेरित स्टीअरिंग व्हील प्रदान करण्यात आली आहे. यात नवीन फ्लोटिंग सेंटर कन्सोल डिझाइन आहे. वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झाले तर, त्यात पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेईकल टू लोड (V2L) तंत्रज्ञान, 360-डिग्री कॅमेरा, ADAS सूट तसंच ह्युंदाईचं डिजिटल की फीचर आहे.

क्रेटा ईव्हीचा आकार
क्रेटा ईव्हीची लांबी 4,330 मिमी असून रुंदी 1,790 मिमी आहे. तसंच कारची उंची 1,635 मिमी आहे. या कारचा व्हीलबेस 2,610 मिमी देण्यात आला असून क्रेटाचा ग्राउंड क्लिअरन्स 200 मिमी आहे. क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये लिथियम मेटल बेस्ड कंपोझिट (LMC) बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ती गाडीच्या फ्लोअर बोर्डमध्ये बसवण्यात आली आहे. त्याची स्थिती निश्चित करण्यासाठी, कंपनीनं एसयूव्हीचं सस्पेंशन बदललं आहे. त्यामुळे, इलेक्ट्रिक क्रेटाचा ग्राउंड क्लीयरन्स क्रेटा आयसीई आवृत्तीच्या तुलनेत 10 मिमीनं वाढला आहे. कारची उंची 20 मिमीनं वाढली आहे. इतर कार उत्पादक लिथियम आयर्न फॉस्फेट (LFP) बॅटरी वापरत असताना, Hyundai नं LMC बॅटरी पॅक प्रदान केला आहे.

बॅटरी पॅकसह रेंज
क्रेटा इलेक्ट्रिक दोन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये येत आहे. ज्यामध्ये 42kWh आणि 51.4 kWh बॅटरीचा समावेश आहे. या दोन्ही बॅटरी पॅकमध्ये अनुक्रमे 390 किमी आणि 473 किमीची रेंज आहे. ह्युंदाईचा दावा आहे की क्रेटा इलेक्ट्रिक 7.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते. यात तीन ड्राईव्ह मोड आहेत ज्यात इको, नॉर्मल आणि स्पोर्ट यांचा समावेश आहे. यात स्टीयरिंग कॉलम-माउंटेड ड्राइव्ह मोड सिलेक्टर आहे, जो आयोनिक 5 सारखा आहे.

58 मिनिटांत चार्ज
ह्युंदाईचा दावा आहे की क्रेटा इलेक्ट्रिक फक्त 58 मिनिटांत 10 टक्के ते 80 टक्के चार्ज होऊ शकते, तर 11 किलोवॅट एसी वॉल बॉक्स चार्जरसह, ती 4 तासांत 10 टक्के ते 100 टक्के चार्ज होऊ शकते. . क्रेटा इलेक्ट्रिक ही गाडी एक्झिक्युटिव्ह, स्मार्ट, प्रीमियम आणि एक्सलन्स या 4 प्रकारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. ही एसयूव्ही 8 मोनोटोन आणि 2 ड्युअल-टोन रंग पर्यायांसह दिली जात आहे. ज्यामध्ये 3 मॅट रंग देखील समाविष्ट आहेत.

Tata Harrier EV
टाटा मोटर्सनं कंपनीची पहिली मध्यम आकाराची इलेक्ट्रिक एसयूव्ही हॅरियर ईव्ही देखील सादर केली. ती या वर्षाच्या अखेरीस लाँच होण्याची शक्यता आहे. हॅरियर ईव्हीमध्ये कनेक्टेड एलईडी डीआरएल स्ट्रिपसह क्लोज-ऑफ ग्रिल आहे. पुन्हा डिझाइन केलेले बंपर आणि एरो-ऑप्टिमाइज्ड 5-स्पोक अलॉय व्हील्स ईव्हीला आकर्षक करताय. तसंच दारांवर ईव्ही बॅजिंग देखील आहे. सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये सात एअरबॅग्ज, लेव्हल-2 एडीएएस, टायरप्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, 360-डिग्री कॅमेरा आणि फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स समाविष्ट आहेत. कारच्या किंमतींचे तपशील अद्याप जाहीर झालेले नाहीत.

Tata Sierra ICE
टाटा मोटर्सनं सिएरा अंतर्गत ज्वलन इंजिन (ICE) सादर केलीय. ही कार इलेक्ट्रिक दोन्ही आवृत्त्यांमध्ये उपलब्ध होणार आहे. या करामध्ये समोर एक रुंद एलईडी लाईट बार, एक विशिष्ट ग्रिल, क्लासिक आयताकृती साइड विंडो डिझाइन, एलईडी लाईट, स्ट्रिप अशी वैशिष्ट्ये आहेत.

दोन इंजिन पर्याय
यात 1.5 -लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आणि 2-लिटर डिझेल इंजिन, असण्याची शक्यता आहे. हे इंजन 170 बीएचपीची शक्ती उत्पादन करतं. इंजिनला 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह जोडलं जाईल.

Tata Avinya X
टाटा मोटर्सनं अविन्या एक्स देखील यावेळी सादर केली, जी प्रीमियम ईव्हीच्या नवीन लाइनअपमधील पहिले मॉडेल असण्याची अपेक्षा आहे. ही मोठी कूप-एसयूव्ही संकल्पना 2022 मध्ये जाहीर झालेल्या अविना संकल्पनेच्या पूर्वीच्या वॅगनसारख्या डिझाइनपासून वेगळी आहे. अविना श्रेणीतील पहिलं मॉडेल 226 मध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे. अविन्या एक्स संकल्पनेत विंडस्क्रीन, उच्च ग्राउंड क्लीयरन्स, मस्क्युलर बॉडी पॅनेल आहेत. समोर आणि मागच्या बाजूला विस्तारित 'टी' लोगो, जो एलईडी लाइटिंग सिग्नेचर आहे. बंपरवरील ग्लॉस ब्लॅक फिनिश एकूण डिझाइनला अणखी आकर्षक बनवतं.

MG Cyberster EV
एमजी सायबरस्टर ईव्ही भारतात लाँच करण्यात आली आहे. एमजी सायबरस्टरची ही भारतात विकली जाणारी पहिली ऑल इलेक्ट्रिक टू डोअर कन्व्हर्टिबल आहे. ही कार लवकरच ती लाँच होण्याची अपेक्षा आहे.

एमजी सायबरस्टर ईव्ही वैशिष्ट्ये
एमजी सायबरस्टरमध्ये एलईडी डीआरएलसह एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्स आणि क्रोम एमजी लोगो आहे. बंपरमध्ये बॅटरी पॅक आणि इलेक्ट्रिकल घटकांना थंड करण्यास मदत करण्यासाठी फंक्शनल एअर व्हेंट्ससह काळ्या लोअर ग्रिलचा समावेश आहे. मागील बाजूस, बाणाच्या आकाराचे एलईडी टेल लाइट्स आणि उलटा यू-आकाराचा लाईट बार आहे.

एमजी सायबरस्टर इंटीरियर
नवीन एमजी सायबरस्टरमध्ये ट्राय-स्क्रीन डॅशबोर्ड सेटअप आहे, ज्यामध्ये ड्रायव्हरच्या डिस्प्लेसाठी दोन स्क्रीन (7-इंच युनिट आणि 10.25-इंच युनिट) आणि 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम समाविष्ट आहे. सेंटर कन्सोलवर असलेल्या एसी कंट्रोल्ससाठी एक अतिरिक्त स्क्रीन आहे. केबिनमध्ये स्पोर्टी सीट्स आणि ऑडिओ आणि ड्रायव्हरच्या डिस्प्लेसाठी नियंत्रणे असलेले मल्टी-स्पोक फ्लॅट-बॉटम स्टीअरिंग व्हील आहे. स्टीअरिंग व्हीलमध्ये लाँच कंट्रोलसाठी गोल डायल आणि रीजनरेशन मोड समायोजित करण्यासाठी पॅडल शिफ्टर्स देखील समाविष्ट आहेत. सुरक्षिततेसाठी सायबरस्टरमध्ये 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण (ESC) आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आहे. यामध्ये लेन-कीप असिस्ट आणि अ‍ॅक्टिव्ह इमर्जन्सी ब्रेकिंग सारख्या प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) वैशिष्ट्यांचा देखील समावेश आहे.

बॅटरी पॅक आणि रेंज :एमजी सायबरस्टर ईव्हीमध्ये सिंगल बॅटरी पॅक पर्याय असेल, जो दोन इलेक्ट्रिक मोटर्सशी जोडलेला असेल. आंतरराष्ट्रीय-स्पेक सायबरस्टरमध्ये मागील एक्सलवर एकाच मोटर बसवण्यात आली आहे, जी बॅटरी पॅक पर्यायासह जोडलेली आहे. या कारची रेंज 500 किमी पेक्षा जास्त आहे.

Kia EV6 Facelift
किआनं भारतात EV6 फेसलिफ्ट सादर केली आहे. ही अपडेटेड इलेक्ट्रिक SUV सध्या सुरू असलेल्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये प्रदर्शित करण्यात आली. या कारचं बुकिंग सुरू झालं आहे, परंतु लाँचिंग आणि किंमत मार्चमध्ये जाहीर होईल. किआ EV6 चा मागील मॉडेलसारखाच आकार आहे, परंतु त्यात नवीन हेडलाइट्स, अपडेटेड फ्रंट बंपर, नवीन अलॉय व्हील्स आणि किंचित रिफ्रेश केलेले रिअर फॅसिया आहेत. हे बदल कारला आधुनिक लूक देतात. ज्यात नवीन स्टीअरिंग व्हील, मोठी 12.3 इंच सेंट्रल टचस्क्रीन आणि सुधारित मटेरियल समाविष्ट आहेत.

बॅटरी रेंज
कियानं भारतात फक्त GT-लाइन ट्रिममध्ये EV6 सादर केलr आहे. ती 84 kWh बॅटरी पॅकसह येते. एकावेळी चार्ज केल्यावर कार 650 किमी धावते असं कंपनीचं म्हणणे आहे. यात दोन इलेक्ट्रिक मोटर्स एकत्रितपणे 325 एचपी आणि 605 एनएम पीक टॉर्क निर्माण करतात. Kia EV6 चा बॅटरी पॅक 350 किलोवॅट पर्यंत पीक चार्जिंग स्पीड टिकवून ठेवू शकतो, ज्यामुळं ती 18 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज होऊ शकते.

हे वाचंलत का :

  1. देशातील पहिली CNG स्कूटर सादर, 84 किमी मायलेजसह पेट्रोलवरही धावणार
  2. भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये मारुती सुझुकी ई विटाराची एंट्री, काय आहे खास?
  3. सिम कार्ड खरेदीच्या नियमात बदल : 'ही' पडताळणी केल्याशिवाय सिम कार्ड मिळणार नाही, काय आहे नविन नियम?

ABOUT THE AUTHOR

...view details