महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

सिम कार्ड खरेदीच्या नियमात बदल : 'ही' पडताळणी केल्याशिवाय सिम कार्ड मिळणार नाही, काय आहे नविन नियम? - NEW SIM CARD RULES

केंद्र सरकारनं नविन सिमकार्ड खरेदीच्या नियमात बदल केला आहे. त्यामुळं आता नविन सिमकार्ड खरेदीसाठी नविन नियम लागू झाले आहेत. काय आहेत हे नियम? वाचा...

SIM card purchase rules
प्रातिनिधिक फोटो (Meta AI)

By ETV Bharat Tech Team

Published : Jan 17, 2025, 5:21 PM IST

हैदराबाद :तुम्हाला नवीन सिम कार्ड घ्यायचं आहे का? जर तुम्हाला नवीन सिम कार्ड घ्यायचं असेल, तर त्याआधी तुम्हाला काही गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. कारण, आता सिम कार्ड घेण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे. आता सिमकार्ड घेण्यासाठी काही गोष्ठी अनिवार्य करण्यात आल्या आहेत. चला जाणून घेऊया या गोष्टी नेमक्या काय आहेत.

बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य
पीएमओनं दूरसंचार विभागाला (DOT) महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. यापुढं, सर्व नवीन सिम कार्ड कनेक्शनसाठी आधार कार्डद्वारे बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य केली जाईल. म्हणजेच, आता सिम कार्ड मिळविण्यासाठी, लोकांना त्यांचे आधार कार्ड दाखवावे लागणार आहे. नागरिकांची ओळख बायोमेट्रिक पद्धतीनं पडताळल्यानंतरच त्यांना सिमकार्ड मिळणार आहे. खोट्या कागदपत्रांचा वापर करून सिम कार्ड खरेदी करणे, फसवणुकीसह इतर गुन्ह्यांसाठी खोटी कागदपत्र देण्यावर या निर्णयामुळं बंधन येणार आहे.

सिम कार्डसाठी नवीन नियम काय आहेत?
पूर्वी, मतदार ओळखपत्र किंवा पासपोर्टसारख्या कोणत्याही सरकारी कागदपत्राच्या आधारे नागरिकांना नवीन सिम कार्ड खरेदी करता येत होतं. परंतु आता नवीन नियमांनुसार, सर्व नवीन सिम कार्ड खरेदीसाठी आधार बायोमेट्रिक पडताळणी आवश्यक करण्यात आली आहे. कंपन्या आता आधार कार्डशिवाय कोणालाही सिम कार्ड देऊ शकणार नाहीत. अनेक लोक बनावट कागदपत्रांचा वापर करून सिम कार्ड खरेदी करत असल्याचं आपल्याला अनेकदा दिसून येत. तसंच अशा कार्डचा गैरवापर गुन्हेगारीसाठी केला जातो. त्यातून सामन्य माणसांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळं पंतप्रधान कार्यालयानं दूरसंचार विभागाला सर्व नवीन सिम कार्डसाठी आधार पडताळणी अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

बनावट कार्ड विकणाऱ्यांवर कारवाई
सरकार आता बनावट कागदपत्रांचा वापर करून सिम कार्ड विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार आहे. यासाठी, सरकार एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा देखील वापर करेल जेणेकरून अशा लोकांना ओळखता येईल आणि त्यांच्यावर कारवाई करता येईल. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा नवीन आदेश देण्यात आला आहे. आधार कार्डद्वारे पडताळणी केल्यानंतर, बनावट सिम कार्ड वापरून होणारी फसवणूक कमी होईल. या आदेशामुळं देशभरात सिम कार्ड जारी करण्यात आणि ट्रॅक करण्यात देखील मदत होईल. अलीकडे, मोठ्या प्रमाणात फसवणुकीची प्रकरणे समोर येत आहेत. तसंच, बनावट कागदपत्रांचा वापर करून सिम कार्ड खरेदी केलं जात आहेत. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी सरकारनं एक मोठे पाऊल उचललं आहे.

हे वाचलंत का :

  1. भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये मारुती सुझुकी ई विटाराची एंट्री, काय आहे खास?
  2. बनावट कॉल आणि मेसेजपासून कायमची सुटका, सरकारनं केलं संचार साथी ॲप लाँच, थेट करा तक्रार
  3. Realme 14 Pro 5G VS 14 Pro Plus 5G : कोणात फोन आहे तुमच्यासाठी बेस्ट?, स्पेसिफिकेशन्स आणि किमतीची संपूर्ण माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details