हैदराबाद : दूरसंचार विभागानं बनावट कॉल आणि मेसेजेसची तक्रार करण्यासाठी संचार साथी मोबाइल ॲप लाँच केलंय. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दूरसंचार विभागानं आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान हे मोबाइल ॲप लाँच केलं. याशिवाय, केंद्रीय मंत्र्यांनी राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशन 2.0 देखील लाँच केलं आहे, ज्यामध्ये देशातील प्रत्येक गावात फायबर ब्रॉडबँड सेवा दिली जाईल. 2017 मध्ये, मोदी सरकारनं राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनची घोषणा केली होती, ज्याद्वारे देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीला ऑप्टिकल फायबर (OFC) प्रदान करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं.
Sh.@JM_Scindia, Union Minister of Telecom, today launched Citizen Centric Telecom Initiatives 👇🏻
— DoT India (@DoT_India) January 17, 2025
- SANCHAR SAATHI APP now LIVE
- Unveiling of National Broadband Mission 2.0 Vision Document
- Inauguration of Intra Circle Roaming at DBN-funded 4G Mobile Sites… pic.twitter.com/86VMMboSTN
संचार साथी ॲप लाँच
संचार साथी पोर्टलचा देशातील 120 कोटी मोबाईल वापरकर्त्यांना फायदा होणार आहे. मोबाईल वापरकर्ते त्यांच्या स्मार्टफोनवरून बनावट कॉल आणि मेसेजेसची तक्रार करू शकतील. सरकारनं 2023 मध्ये संचार साथी पोर्टल सुरू केले होतं. या पोर्टलद्वारे, बनावट कॉल आणि मेसेजेसची तक्रार करण्यासोबतच, हरवलेल्या मोबाईल फोनचा IMEI ब्लॉक करता येतो, तसंच आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर तपासता येतो. वापरकर्त्यांना आता मोबाईल अॅपद्वारे या सर्व सुविधा मिळतील. केंद्रीय मंत्र्यांनी भारताच्या वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेत मोबाईल वापरकर्त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला आहे. तसंच, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत मोहिमेत तंत्रज्ञानाच्या योगदानामुळं राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशन 2.0 द्वारे देशभरात इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणखी सुधारली जाईल, असं म्हटलंय.
9 कोटी वापरकर्त्यांना फायदा
संचार साथी बद्दल बोलताना केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं, की या पोर्टलद्वारे 9 कोटी वापरकर्त्यांना फायदा झाला आहे. 5 कोटी बनावट मोबाईल कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. 25 लाख वापरकर्त्यांच्या हरवलेल्या फोनपैकी 15 लाख मोबाईल फोन या पोर्टलद्वारे परत मिळवता आले. दूरसंचार विभागाच्या मते, संचार साथीवर तक्रार केल्यानंतर 3.13 लाख मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्यात आले आहेत. 2.75 कोटी मोबाईल कनेक्शन डिस्कनेक्ट करण्यात आले आहेत. इतकंच नाही, तर या पोर्टलद्वारे 71 हजारांहून अधिक सिम कार्ड विक्रेत्यांना काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे. तसंच, 186 बल्क एसएमएस पाठवणारे आणि 1.3 लाख एसएमएस टेम्पलेट्स ब्लॉक करण्यात आले आहेत. तसंच, १२ लाख व्हॉट्सॲप अकाउंट आणि 11 लाख बँक अकाउंट गोठवण्यात आली आहेत.
कसं डाउनलोड करायचं?
तुम्ही संचार साथी वेबसाइटवरील क्यूआर कोड स्कॅन करून तुमच्या स्मार्टफोनवर संचार साथी मोबाईल ॲप डाउनलोड करू शकता. याशिवाय, तुम्ही गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवरून हे ॲप शोधून डाउनलोड करू शकता. ॲप डाउनलोड केल्यानंतर, तुमच्या मोबाइल नंबरचा वापर करून त्यात लॉग इन करा.
हे वचालंत का :