ETV Bharat / state

पारंपरिक शेतीला आधुनिक मत्स्यपालनाची जोड; आदिवासी तरुणाचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान - YOHAN GAVIT

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील आदिवासी वस्तीमध्ये राहणार्‍या शेतकरी योहान अरविंद गावित (Yohan Gavit) यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर संपूर्ण देशाला प्रेरणा दिली आहे.

Nandurbar News
शेतकरी योहान गावित (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2025, 10:56 PM IST

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. जिल्ह्यातील प्रमुख म्हणजे 'शेती व्यवसाय' आहे. मिरची, मका, गहू, बाजरी आणि कापूस ही प्रामुख्यानं पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. मात्र, यातून शेतीला जोडधंदा म्हणून काही शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन, शेळीपालन, दूध व्यवसाय सुरू केलाय. यावर मात नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील भवरे आदिवासी वस्तीतील शेतकरी 'योहान अरविंद गावित' यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर संपूर्ण देशाला प्रेरणा दिली आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करणार सन्मानित : पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत शेतकरी योहान गावित यांनी पिंजऱ्यातील मत्स्य व्यवसायातून असामान्य यश प्राप्त केलंय. त्यांच्या या कर्तृत्वाची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याहस्ते प्रजासत्ताकदिनी (२६ जानेवारी २०२५) त्यांना राजधानी दिल्ली येथे सन्मानित करण्यात येणार आहे. आदिवासी युवकाच्या या सन्मानामुळं जिल्ह्याचं नाव दिल्लीपर्यंत पोहोचलं आहे.

प्रतिक्रिया देताना शेतकरी योहान गावित (ETV Bharat Reporter)

गावातून दिल्लीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास : भवरे गावात राहणाऱ्या योहान गावित यांनी आठ वर्षांपूर्वी आपल्या पारंपरिक शेतीसोबत मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला. मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत शासनाकडून ६० टक्के अनुदान मिळवलं. या योजनेतून त्यांना १८ पिंजरे उभारण्यासाठी सुमारे ३२.४० लाख रुपयांचं अनुदान मंजूर झालं. गावित यांनी या आर्थिक सहाय्याचा योग्य तो उपयोग करत आपल्या गावातील तलावात अत्याधुनिक पद्धतीनं मत्स्यपालन सुरू केलं.

मत्स्य व्यवसायातील आधुनिकता आणि सामाजिक दृष्टीकोन : योहान गावित यांनी मत्स्यपालन व्यवसायाला फक्त आर्थिक उपजीविकेपुरतं मर्यादित ठेवलं नाही, तर या व्यवसायातून इतर शेतकऱ्यांनाही सक्षम बनवलं. त्यांनी आपल्या पिंजऱ्यांमध्ये मत्स्यबीज तयार करुन ते शेतकऱ्यांना पुरवलं. याशिवाय, मत्स्यपालनासाठी लागणारे साहित्य पुरवून शेतकऱ्यांच्या व्यवसायिक गरजा भागवल्या. आज त्यांच्या या कामामुळं भवरे गाव आणि परिसरातील अनेक शेतकरी मत्स्य व्यवसायाकडं वळले आहेत. योहान गावित यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची प्रशंसा फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर केंद्र शासन स्तरावरही झाली. महाराष्ट्र राज्याचे सहआयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग यांनी त्यांच्या प्रकल्पाची पाहणी करुन केंद्र शासनाला सादर केलेल्या अहवालात या प्रकल्पाचं यश अधोरेखित केलं. यानुसार, केंद्र शासनानं त्यांची निवड करून प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. नुकतेच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ आणि जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांनीही या प्रकल्पाला भेट देवून योहान गावित यांचं कौतुक केलं.

पारंपरिक शेतीला आधुनिक मत्स्यपालनाची जोड
पारंपरिक शेतीला आधुनिक मत्स्यपालनाची जोड (ETV Bharat Reporter)

आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण : भारतीय पोस्ट विभागाचे निरीक्षक भरत चौधरी आणि पोस्टमॅन सुनिल गावित यांनी राष्ट्रपतींच्या सन्मानाचे औपचारिक आमंत्रण योहान गावित यांना सुपुर्द केलं. हे आमंत्रण स्वीकारताना योहान गावित आणि त्यांच्या पत्नी यशोदा गावित यांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद स्पष्ट दिसत होता. “हा आमच्यासाठी फक्त सन्मान नाही, तर आमच्या गावासाठीही अभिमानाची गोष्ट आहे. शासनाच्या अनुदानाचा योग्य वापर करून व्यवसाय उभारता येतो आणि कुटुंबाचा आर्थिक विकास साधता येतो हे आम्ही सिद्ध केलं,” असं भावनिक उद्गार योहान गावित यांनी काढले.

तरुणांसाठी प्रेरणा : योहान गावित यांच्या कर्तृत्वाचा आदर्श घेत जलसाठा असलेल्या इतर गावांतील तरुणही मत्स्यपालनाकडं वळत आहेत. भवरे गावातून सुरू झालेली ही प्रेरणा आता जिल्हा, राज्याची सिमा ओलांडून देशातील इतर भागांपर्यंत पोहोचली आहे.

अधुनिक शेतीचा आदर्श नमुना : योहान गावित यांच्या कामगिरीमुळं शेतीसोबत जोडव्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाच्या योजनांचा प्रभावी उपयोग करता येतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. त्यांच्या कार्यामुळं भवरे गावाचे नाव देशपातळीवर पोहोचलं असून त्यांची ही कामगिरी देशभरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील सन्मान समारंभात नवा इतिहास घडवणाऱ्या योहान गावित यांचं यश ग्रामीण भारतासाठी प्रेरणादायी ठरलं आहे.

हेही वाचा -

  1. तरुण शेतकऱ्यानं डोंगरदऱ्यात फुलवली केळीची बाग; इराणला लागली केळींची गोडी
  2. घरातच अवतरले काश्मीरचे 'सोने'; राहुरीतील शिक्षक दाम्पत्याने घरातच फुलवली 'केशर'शेती
  3. दुष्काळी भागात केली कांद्याच्या पातीची शेती; 7 एकरात पोखरकर बंधू कसे झाले मालामाल? पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.