मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीत आजकाल धमाकेदार चित्रपट प्रदर्शित होत आहेत. आता पुन्हा नवनवीन विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हेमंत ढोमे दिग्दर्शित 'आता थांबायचं नाय!' हा चित्रपट काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना त्यांचे लाडके कलाकार पाहायला मिळणार आहेत. सिद्धार्थ जाधव आणि भरत जाधव पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज झाले आहेत. यापूर्वी त्यांनी 'जत्रा: ह्यलागड रे त्यालागड' आणि बाकी इतर चित्रपटात एकत्र काम केलंय. आता त्याचा 'आता थांबायचं नाय!' हा आगामी चित्रपट खूप जोरदार असणार आहे.' या चित्रपटाचा 19 फेब्रुवारी रोजी टीझर प्रदर्शित झाला. हा टीझर आता प्रेक्षकांना खूप पसंत पडत आहे.
'आता थांबायचं नाय!' चित्रपटाचा टीझर : या चित्रपटाच्या टीझरवरून असं वाटत आहे, की या चित्रपटाची कहाणी काहीतरी वेगळी असेल. टीझरच्या पहिल्या झलकमध्ये काही लोक रस्त्यावरून धावताना दिसत आहेत. यानंतर सिद्धार्थ जाधव आणि भरत जाधव यांची देखील एंट्री होते. हे दोघेही एका ऑफिसच्या दिशेन धावत आहे. सिद्धार्थ जाधव आणि भरत जाधव या दोघांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हावभाव असल्याचे दिसत आहे. आता या चित्रपटाची कहाणी कशावर आधारित असणार याबद्दल जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. टीझरधील पार्श्वभूमीतील गाणं हे खूप विशेष आहे. या गाण्याच्या संगीतानं देखील सर्वांची मनं जिंकली आहेत.
'आता थांबायचं नाय!' चित्रपटाची स्टार कास्ट : रिलीज झालेल्या टीझरच्या पोस्टमध्ये निर्मात्यांनी लिहिलंय, 'छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त स्टुडिओज् ची शिवगर्जना – 'आता थांबायचं नाय!' पाहा पहिली झलक! 1 मे 2025 पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!' या चित्रपटाचे निर्माते उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, निधी परमार हिरानंदानी आणि धरम वालिया हे आहेत. तसेच या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचल यांनी केलं आहे. या चित्रपटामध्ये सिद्धार्थ जाधव आणि भरत जाधव व्यतिरिक्त आशुतोष गोवारीकर, किरण खोजे, ओम भुतकर, पर्ण पेठे आणि प्राजक्ता हनमगर हे कलाकार आहेत. आता या चित्रपटाच्या टीझरचं अनेकजण कौतुक करत आहेत.
हेही वाचा :