ETV Bharat / state

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार दावोस दौऱ्यावर, वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये होणार सहभागी - DEVENDRA FADNAVIS DAVOS VISIT

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 20 ते 24 जानेवारी दरम्यान दावोस दौऱ्यावर जाणार आहेत. दावोस इथं होणाऱ्या वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये मुख्यमंत्री सहभागी होणार आहे.

Devendra Fadnavis Davos Visit
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2025, 10:39 PM IST

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या 20 ते 24 जानेवारी या काळात दावोसमध्ये वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. यासंदर्भात माहिती देताना ते म्हणाले की, "वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही अशी जागा आहे, जिथे जगातले सगळे बिजनेस लीडर्स आणि पॉलिटिकल लीडर्स एकत्र येतात. या ठिकाणी मोठया प्रमाणात नेटवर्किंग तर होतंच, विचारांचं आदान प्रदान देखील होते. मोठ्या प्रमाणात इन्वेस्टमेंट नेटवर्किंग होते, त्या दृष्टीने मी दावोसला चाललो आहे. अनेक महत्त्वपूर्ण बैठकी ठरलेल्या आहेत. अनेक बिझनेस लीडर आणि वर्ल्ड लीडरसोबत बैठकी ठरलेल्या आहेत. मला विश्वास आहे की तिथे चांगल्या प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यास आम्ही यशस्वी होऊ,"

दिल्लीत भाजपची सरकार येईल : दिल्ली येथील जनतेचा केजरीवाल यांच्यावरील विश्वास उठलेला आहे. दिल्लीचे नागरिक मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार दिल्लीत आणणार आहेत, असं त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांबाबतही भाष्य केलं. लवकरच पालकमंत्र्यांची घोषणा होईल, आमचं काम शेवटच्या टप्प्यात आलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Reporter)

तपास यंत्रणा रोज माहिती सांगू शकत नाही : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास यंत्रणांना नीटपद्धतीनं करू दिला पाहिजे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. "सर्व गोष्टी तपास यंत्रणा रोज बाहेर सांगू शकत नाहीत. तपासामध्ये सर्व गोष्टी गोपनीयता ठेवून तपास केला जातो. त्यामुळे मला असं वाटत की तपास यंत्रणावर दबाव न आणता त्यांना काम करू दिलं पाहिजे. मी निश्चितपणे सांगतो कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही. तपास यंत्रणा योग्य प्रकारे काम करत आहेत."

उज्वल निकम सकारात्मक निर्णय घेतील : "सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती केली गेली पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे. त्यांच्या सोबत या बाबतीत चर्चा झालेली आहे. मला विश्वास आहे की ते सकारात्मक निर्णय घेतील. ते मला बोलताना म्हणाले माझी नेमणूक झाल्यानंतर विनाकारण काही लोक राजकारण करतील, त्यामुळे मला योग्य वाटत नाही. देशात अनेक वकील आहेत. ते वेगवेगळ्या पक्षात आहेत. त्याचं राजकारण होत नाही. परंतु उज्वल निकम यांच्या नियुक्तीला राजकारण करणं कुठंतरी गुन्हेगारांना मदत करण्यासारखं आहे. कारण उज्वल निकामांचा इतिहास आहे, की त्यांनी केस घेतल्यावर गुन्हेगारांना शिक्षा होते," असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पोलिसांकडे अनेक क्लू : "अभिनेता सैफअली खान याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी जी माहिती पोलिसांनी दिली आहे, त्याच्या पलीकडची माहिती आता तरी नाही. बरेच क्लू पोलिसांकडं आहेत. पोलीस काम करत आहेत, मला विश्वास आहे की पोलीस यासंदर्भात कारवाई पूर्ण करतील."

हेही वाचा :

  1. राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांबाबतचे 'हे' सर्वाधिकार देवेंद्र फडणवीसांकडं; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय कोणते?
  2. इंदिरा गांधी माझ्यासाठी 'खलनायक'; इमर्जन्सीच्या स्पेशल शोमध्ये देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
  3. पान‍िपतमध्ये शिवाजी महाराजांचा उभारणार पुतळा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.