ETV Bharat / state

धक्कादायक! उपजिल्हा रुग्णालयातून मृताच्या अंगावरील ४ तोळे सोने आणि रोख रक्कम पळवली - SAMBHAJINAGAR CRIME NEWS

मृताच्या टाळूवरील लोणी खाणे म्हणजे काय, याचा प्रत्यय गंगापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये आला. जिल्ह्यातील एका रुग्णालयात मृतदेहाच्या अंगावरील सोने चोरल्यानं संताप व्यक्त केला जात आहे.

File Photo
४ तोळे सोने १३ हजार रोख रक्कम पळवली (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2025, 10:19 PM IST

छत्रपती संभाजीनगर : उपजिल्हा रुग्णालयातून मृताच्या अंगावरील ४ तोळे सोने १३ हजार रोख रक्कम पळवल्यानं खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी एक आरोपी ताब्यात घेतला असून मुद्देमाल जप्त केला आहे. गंगापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये (Gangapur Hospital) अपघातातील मृतदेहावरील २ लाख ८० हजाराचे सोन्याचे दागिने आणि जखमीच्या खिशातील १३ हजार रुपये चोरीस गेल्यानं नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. वेरूळ येथील घृष्णेश्वराचं दर्शन घेऊन हैदराबाद येथील १४ भाविक मंगळवारी शिर्डी येथे आले होते. या अपघातातील मृतांच्या अंगावरील 4 तोळं सोनं आणि रोख पळवण्यात आली, अशी माहिती पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी दिली.

जीपचा भीषण अपघात : दर्शन घेऊन बाविक बुधवारी सकाळी जीपमधून वेरूळ लेण्या पाहिल्यानंतर घृष्णेश्वराला दर्शनासाठी गेले. त्यानंतर गंगापूरमार्गे शिर्डीला जात असताना रात्री १० वाजेच्या सुमारास तांबूळगोटा फाटा इथं त्यांच्या जीपला भीषण अपघात झाला. या अपघातात वैद्विक श्यामशेट्टी (६ महिने), अक्षता गडकुनुरी (वय २१) व प्रेमलता श्यामशेट्टी (५८) प्रसन्ना लक्ष्मी (४५) यांचा मृत्यू झाल्याची माहिती कुमारसिंग राठोड यांनी दिली.

प्रतिक्रिया देताना पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड (ETV Bharat Reporter)
नातेवाईक आल्याने प्रकार उघड : अपघातातील मृतांचे नातेवाईक हे गंगापूर येथे आले असता त्यांना मृतांच्या अंगावर असलेले दागिने आढळून आले नाहीत. त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडं विचारपूस केली असता त्यांना कोणीही माहिती दिली नाही. यानंतर त्यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

एका विरोधात गुन्हा दाखल : अपघातातील मृताच्या अंगावरील सोने उपजिल्हा रुग्णालयातून पळवल्यानं सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. नातेवाईकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत सोने पळवणाऱ्या आरोपीस ताब्यात घेतलं. आकाश साळवे असं आरोपीचं नाव असून त्याच्या ताब्यातून २ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी दिली.

हेही वाचा -

  1. आमदाराचा नातेवाईक असल्याचं सांगून नागरिकांना लुबाडायचा; हाफ सेंच्युरीहून अधिक गुन्हे दाखल झाल्यानंतर भामट्यास अटक
  2. पुण्यापाठोपाठ मुंबईतही कोयता गँगची दहशत : कोयत्यानं हल्ला करून व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न, सात जणांना अटक
  3. सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई; 20 प्रकरणांमध्ये 6.75 कोटी रुपयांचे सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.