हैदराबाद : भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो (BMGE 2025) आजपासून दिल्लीत सुरू झाला आहे. या एक्स्पोच्या पहिल्या दिवशी, देशातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी मारुती सुझुकीनं त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार 'मारुती ई विटारा' सादर केली. लोक या इलेक्ट्रिक एसयूव्हीची बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होते.
नवीन ई विटारा सुझुकीतचं एक जागतिक मॉडेल आहे. ई विटारा 100 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जाणार आहे. ही कार सुझुकीच्या गुजरात प्लांटमध्ये तयार केली जाणार आहे. ती भारतातून युरोप आणि जपानमध्ये देखील निर्यात केली जाईल, चला जाणून घेऊया कारबद्दल संपूर्ण माहिती...
मारुती ई विटारा : डिझाइन
मारुती ई-विटारा ही EVX च्या संकल्पनेसारखीच आहे. या कारला कंपनीनं मस्क्युलर डिझाइन दिलं आहे. यात समोर ऑफ-ड्रिलसह ट्राय-एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आहेत. कारच्या खालचा बाजूचा बंपर ब्रेझासारखा दिसतोय. त्यात स्किड प्लेटसह एक लहान फॉग लॅम्प आहे. चार्जिंग पोर्ट समोर दिसतोय.
बॅटरी पॅक आणि रेंज
कंपनीनं मारुती ई विटारा दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह सादर केली आहे. ज्यामध्ये 49 किलोवॅट आणि 61 किलोवॅटचा समावेश आहे. मारुती ई विटारामधील मोठ्या बॅटरी पॅकला ड्युअल-मोटर ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) सेटअप देण्यात आला आहे. त्यात ब्लेड सेल लिथियम-आयरन-फॉस्फेट बॅटरी पॅक आहे.
पॉवर आणि परफॉर्मन्स
समोरच्या एक्सलवर सिंगल मोटर असलेली 49 किलोवॅटची बॅटरी 144 एचपी पॉवर जनरेट करते. तर, सिंगल मोटर असलेली मोठी लोवॅट बॅटरी पॅक 174 एचपी पर्यंत पॉवर आउटपुट देतो. 49 किलोवॅट आणि 61 किलोवॅट दोन्ही व्हर्जन 189 एनएम टॉर्क जनरेट करतात.
काय योजना आहे?
कंपनी लवकरच गुजरातमध्ये ई विटाराचं उत्पादन सुरू करणार आहे.
ई विटारा 100 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जाणार आहे.
भारतात ई विटारासाठी 2100 कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात येणार आहे.
भारतातील 100 मोठ्या शहरांमध्ये जलद चार्जिंग स्टेशन कंपनी स्थापन करणार आहे.
कंपनी दर 5-10 /किमी अंतरावर चार्जिंग स्टेशन स्थापित करेल.
भारतातील सर्व्हिस स्टेशनवर 1500 चार्जिंग स्टेशन स्थापित केले जातील.
भारतातून युरोप आणि जपानमध्ये या कारची निर्यात केली जाणार आहे.
हे वाचलंत का :