ETV Bharat / technology

Bharat Mobility Expo 2025 : दिल्लीमध्ये आजपासून ऑटो एक्स्पो सुरू, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन - BHARAT MOBILITY GLOBAL EXPO 2025

Bharat Mobility Expo 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 चं दिल्लीतील भारत मंडपम येथे उद्घाटन होणार आहे.

Auto Expo 2025
इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 (Bharat Mobility website)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Jan 17, 2025, 9:56 AM IST

हैदराबाद Bharat Mobility Expo 2025 : भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 चं उद्घाटन आज (शुक्रवार, 17 जानेवारी) होत आहे. हा एक्सपो दिल्लीतील तीन प्रमुख ठिकाणी होणार आहे. यात प्रगती मैदान, द्वारका आणि ग्रेटर नोएडाचा समावेश आहे. इंडिया एक्स्पो सेंटर अँड मार्ट येथे आयोजित या मेगा इव्हेंटमध्ये भारत आणि परदेशातील अनेक मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्या सहभागी होताय.

मोदींच्या हस्ते मेगा इव्हेंटचं उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भारत मंडपम येथे या मेगा इव्हेंटचं उद्घाटन करतील. उद्घाटन समारंभानंतर, पहिला दिवस केवळ माध्यमांसाठी समर्पित असेल, तर दुसरा दिवस डीलर्ससाठी राखीव असेल. यानंतर, 19 ते 22 जानेवारी दरम्यान, हा एक्स्पो सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्वसामान्यांसाठी खुला असेल. विशेष म्हणजे, या एक्स्पोमध्ये प्रवेश पूर्णपणे मोफत आहे, परंतु मोटर शोमध्ये भाग घोण्यासाठी तुम्हाला नोंदणी करणं अनिवार्य असेल. तुम्ही नोंदणीसाठी, http://www.bharat-mobility.com ला भेट द्यावी देऊन नोंदणी करू शकता.

आघाडीच्या कंपन्यांचा सहभाग
हिरो मोटोकॉर्प आणि सुझुकी मोटरसायकल इंडिया सारख्या कंपन्या दुचाकी क्षेत्रात आघाडीची भूमिका बजावतील. त्याच वेळी, प्रवासी वाहनांच्या क्षेत्रात, मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटर इंडिया, टाटा मोटर्स, किआ इंडिया, एमजी मोटर इंडिया आणि स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया सारखे ब्रँड त्यांचे नवीन आणि अपग्रेड केलेले मॉडेल सादर करतील. लक्झरी कार सेगमेंटमध्ये, मर्सिडीज-बेंझ, बीएमडब्ल्यू इंडी आणि पोर्श इंडिया सारखे आघाडीचे ब्रँड त्यांच्या आलिशान आणि प्रीमियम वाहनांचं प्रदर्शन करतील. त्याच वेळी, टाटा मोटर्स आणि व्हीई कमर्शियल व्हेईकल्स देखील व्यावसायिक वाहन सेगमेंटमध्ये त्यांची मजबूत उपस्थिती दर्शवतील.

इलेक्ट्रिक वाहनांवर विशेष भर
या वर्षीच्या एक्स्पोमध्ये इलेक्ट्रिक वाहनांवर (ईव्ही) विशेष भर देण्यात आला आहे. सरकारनं 2030 पर्यंत प्रवासी वाहनांचं 30% विद्युतीकरण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. या दिशेनं एक्स्पो महत्त्वाचं मानला जात आहे, कारण या व्यासपीठामुळं इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांना त्यांचे नवीन तंत्रज्ञान आणि मॉडेल प्रदर्शित करता येतील. टाटा मोटर्स, महिंद्रा इलेक्ट्रिक आणि इतर आघाडीच्या कंपन्या त्यांची प्रगत इलेक्ट्रिक वाहने सादर करतील.

नविन कंपन्याचा सहभाग : याशिवाय, BYD इंडिया आणि VinFast ऑटो सारख्या नवीन बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या कंपन्या देखील त्यांच्या नाविन्यपूर्ण उत्पादनांसह चर्चेत येण्याची तयारी करत आहेत. मोठ्या बॅटरी पॅक आणि लांब रेंजसह नवीन ग्राउंड-अप इलेक्ट्रिक वाहनांमध्ये या क्षेत्रात क्रांती घडवण्याची क्षमता आहे. इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 हा देशाच्या ऑटोमोबाईल उद्योगासाठी गेम चेंजर मानला जात आहे. हा एक्स्पो केवळ जागतिक स्तरावर उद्योग स्थापित करणार नाही तर, इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या दिशेनं महत्वाचं पाऊल ठरणार आहे.

हे वाचलत का?

  1. सॅमसंग दोन स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच करणार, दमदार फीचर्ससह असेल जबरदस्त डिझाईन
  2. महिंद्रा XEV 9e, BE 6 ला BNCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग
  3. Realme 14 Pro+ 5G आणि Realme 14 Pro 5G स्मार्टफोन लाँच, किंमत आणि फिचरसह संपूर्ण माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.