बीड - संतोष देशमुख खून प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीकडे आहे. आता या प्रकरणातील सीआयडीचे अधिकारी असलेले अनिल गुजर यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेले आहे. आता त्यांच्या जागी किरण पाटील यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांची उचलबांगडी - या अगोदर एसआयटी पथकामधील बऱ्याच अधिकाऱ्यांची उचलबांगडी देखील करण्यात आली होती. त्यानंतर आता सीआयडी मधील जे अधिकारी आहेत यांची देखील आता उचलबांगडी होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात संतोष देशमुख खून प्रकरणाचा तपास वेगाने व्हावा याच्यासाठी ही सर्व प्रक्रिया केली जात असल्याची माहिती मिळत आहे.
तडकाफडकी बदली - संतोष देशमुख खून प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन घुले आहे असं अनिल गुजर यांनी सांगितलं होतं. मात्र यामध्ये वाल्मीक कराड हे मुख्य आरोपी आहेत असं सांगितलं नाही म्हणून अनिल गुजर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे अशी माहिती मिळत आहे. या तपास कामी पहिल्या दिवसापासून अनिल गुजर हे तपास करत होते. यामध्ये अनेक वेळा ते केज न्यायालयात देखील या प्रकरणात हजर राहिले. त्यानंतर बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात देखील त्यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर आज सकाळी त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यामुळे यांच्या जागी किरण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची नजर - संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर आणि कोणत्याही त्रुटींशिवाय व्हावा यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आग्रही आहेत. तसंच या प्रकरणी दोषी असणाऱ्या कुणालाही सोडणार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे हे हायप्रोफाईल प्रकरण लवकरात लवकर आणि चांगल्या पद्धतीनं हाताळं जावं याची ते स्वतः काळजी घेत आहेत.
हेही वाचा...
- संतोष देशमुख हत्याकांड : खंडणीतील आरोपी विष्णू चाटेची लातूर कारागृहात रवानगी; जाणून घ्या काय आहे कारण ?
- अखेर न्यायालयीन चौकशीचे आदेश, संतोष देशमुखांच्या हत्येसह सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूची होणार चौकशी
- संतोष देशमुख हत्याकांड : वाल्मिक कराड याला 7 दिवसाची एसआयटी कोठडी, न्यायालयाची एसआयटीवर प्रश्नांची सरबत्ती