मुंबई - अभिनेत्री कंगना राणौत पुन्हा मोठ्या पडद्यावर आपल्या 'इमर्जन्सी' चित्रपटाद्वारे परत आली आहे. तिचा हा चित्रपट 17 जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. मात्र हा चित्रपट पंजाबमध्ये प्रदर्शित झाला नाही पाहिजे, यावर अनेकजण विरोध करत आहेत. या चित्रपटात कंगना राणौत इंदिरा गांधींच्या भूमिकेत आहे. या चित्रपटामध्ये अनुपम खेर, मिलिंद सोमन, महिमा चौधरी, दिवंगत सतीश कौशिक आणि श्रेयस तळपदे हे प्रतिभावान कलाकार देखील आहेत. 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे सध्या पंजाबमध्ये चित्रपटगृहांबाहेर राडा होत आहेत.
कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' पंजाबमध्ये धोक्यात : दरम्यान कंगना पंजाबमध्ये चालत असलेल्या प्रदर्शनाबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. तिनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, "हा कला आणि कलाकारांचा पूर्णपणे छळ आहे, पंजाबमधील अनेक शहरांमधून असे वृत्त येत आहे की, हे लोक 'इमर्जन्सी' प्रदर्शित होऊ देत नाहीत. मला सर्व धर्मांबद्दल अत्यंत आदर आहे आणि चंदीगडमध्ये शिक्षण घेतल्यानंतर आणि वाढल्यानंतर मी शीख धर्माचे बारकाईने निरीक्षण केले आहे. मी या धर्माला खूप मानते. माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि माझ्या चित्रपटाला हानी पोहोचवण्यासाठी केलेल्या काही खोट्या अफवा आहेत.' आता सोशल मीडियावर कंगनाची पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.
This is complete harassment of art and the artist, from Punjab many cities are reporting that these people are not allowing Emergency to be screened.
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 17, 2025
I have utmost respect for all religions and after studying and growing up in Chandigarh I have closely observed and followed Sikh… https://t.co/VQEWMqiFih
विधानसभेचे सदस्य सुखपाल सिंग खैरा यांची पोस्ट व्हायरल : आता कंगनाच्या या पोस्टवर विधानसभेचे सदस्य सुखपाल सिंग खैरा यांनी आपलं मत मांडलं आहे. त्यांनी कंगनाला उत्तर देत लिहिलं,' मी शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीतच्या मागणीचं समर्थन करत आहे. या चित्रपटात शिखांना वाईट पद्धतीनं दाखवणाऱ्या, आपल्या पंजाब राज्याची आणि तिथल्या लोकांची बदनामी करणाऱ्या चित्रपटावर तात्काळ बंदी घालण्यासाठी पावले उचलावीत.' या पोस्टमध्ये पंजाबचे सीएम भगवंत मान यांना देखील टॅग केलं गेलं आहे. आता या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. याशिवाय अनेकजण कंगनाच्या या चित्रपटावर देखील टीका करत आहेत.