हैदाबाद : आज 11 फेब्रुवारी 2025 रोजी सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जात आहे. गेल्या काही वर्षांपासून, सुरक्षित इंटरनेट दिन (एसआयडी) जगभरात लोकप्रिय जागरूकता कार्यक्रम बनला आहे. 2004 मध्ये ईयू सेफबॉर्डर्स प्रकल्पाच्या पुढाकारानं या दिनाची सुरुवात झाली. त्यानंतर 2005 मध्ये इनसेफ नेटवर्कनं हा दिवस साजरा करायला सुरवात केली. सुरक्षित इंटरनेट दिन आता युरोपियन कमिशनच्या मदतीनं इनसेफ नेटवर्कद्वारे आयोजित केला जातो. सुरक्षित इंटरनेट दिन आता जगभरातील सुमारे 190 देशांमध्ये साजरा केला जातो.
इंटरनेट दिनाची थीम
या वर्षी इंटरनेट दिनची थीम "ऑनलाइन घोटाळ्यांपासून स्वतःचं आणि इतरांचं संरक्षण करणे" आहे. ऑनलाइन घोटाळ्यांपासून संरक्षण कसं करावं?, तसंच त्यांच्यासाठी कोणती संसाधनं उपलब्ध आहेत, असा या दिनाचा विषय असेल.
इंटरनेट दिनाच महत्त्व
शिक्षण, सामाजिक संवाद आणि व्यवसायासाठी असंख्य संधी इंटरनेटमुळं मिळतेय. जगभरातील लोकांना एकत्र आणणारे एक शक्तिशाली साधन म्हणून देखील याकडं पाहिलं जातं. परंतु त्याच्याशी संबंधित धोके देखील आहेत. अनुचित सामग्री, फिशिंग, डेटा उल्लंघन आणि सायबर धमक्यामुळं इंटरनेट दिनाचं महत्व वाढलं आहे.
इंटरनेट दिन का साजरा केला जातो?
इंटरनेटचा सुरक्षित वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि ऑनलाइन सुरक्षिततेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी सुरक्षित इंटरनेट दिन साजरा केला जातो. डिजिटल जग विकसित होत असताना, किशोरवयीन मुलांकडं इंटरनेटचा सुरक्षित वापर करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती असणं, पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. सुरक्षित इंटरनेट दिन हा जगभरातील सरकारं तसंच नागरिकांनी एकत्र येऊन अधिक सुरक्षित, इंटरनेट कसं वापरता येईल यासाठी प्रोत्साहन द्याला हवं.
माध्यम साक्षरता
ऑनलाइन स्रोत आणि सामग्रीचं गंभीरपणे मूल्यांकन करण्याची क्षमता ही मीडिया साक्षरतेचा एक महत्त्वाचा घटक आहे. आपली मीडिया साक्षरता सुधारून आपण खोटी माहिती, घोटाळं आणि इतर धोकादायक सामग्री ओळखू शकतो.
सशक्त पासवर्ड
तुमचं ऑनलाइन खातं सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही मजबूत आणि विशिष्ट पासवर्ड वापरावा. तुमच्या सर्व खात्यांसाठी समान पासवर्ड वापरण्याऐवजी, तुमचं लॉगिन क्रेडेन्शियल्स लक्षात ठेवण्यासाठी पासवर्ड मॅनेजर वापरण्याचा विचार करावा.
काळजीपूर्वक शेअरिंग
लिंक्डइन, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स आणि टिकटॉक सारख्या सोशल मीडिया साइट्सवर तुम्ही ऑनलाइन काय पोस्ट करता याकडं बारकाईनं लक्ष द्या. यामध्ये खाजगी डेटा, प्रतिमा शेअर करताना काळजी घ्या.
ऑनलाइन सुरक्षा ॲप्स
तुमची गोपनीयता सुरक्षित ठेवण्यासाठी असंख्य विविध ॲप्स उपलब्ध आहेत. नॉर्टन फॅमिली प्रीमियर, क्युस्टोडिओ आणि नेट नॅनी हे काही लोकप्रिय पर्याय आहेत. त्याचा वापर तुम्ही करु शकता.
घोटाळ्यांपासून स्वतःचं कसं रक्षण करावं
काही घोटाळे ईमेल किंवा एसएमएसचा वापर करून केले जातात. हे संदेश आपल्याला डिपार्टमेंट फॉर वर्क अँड पेन्शन (DWP) किंवा सरकारनं पाठवल्यासारखे दिसतात. असे संदेश तुम्हाला ताबडतोब अर्ज सबमिट करण्यास आणि पेमेंटची विनंती करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करतात.