महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

रॉयल एनफील्ड स्क्रॅम 440 भारतात लाँच, किंमत, वैशिष्ट्यासह बरेच काही जाणून घ्या... - ROYAL ENFIELD SCRAM 440 LAUNCH

रॉयल एनफिल्ड नं नवी रॉयल एनफील्ड स्क्रॅम 440 बाजारात लॉन्च केलीय. या मोटरसायकलला कंपनीनं दोन वेरिएंट्समध्ये बाजारात उतरवलंय.

Royal Enfield Scram 440
रॉयल एनफील्ड स्क्रॅम 440 (Royal Enfield)

By ETV Bharat Tech Team

Published : Jan 24, 2025, 11:11 AM IST

हैदराबाद : रेट्रो मॉडर्न मोटरसायकल उत्पादक रॉयल एनफील्डनं नवीन रॉयल एनफील्ड स्क्रॅम 440 भारतीय बाजारात लाँच केलीय. ही मोटरसायकल ट्रेल आणि फोर्स या एकूण दोन प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे, ज्याची किंमत अनुक्रमे 2.08 लाख रुपये आणि 2.15 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

रॉयल एनफील्ड स्क्रॅम 440 ची पॉवरट्रेन
स्क्रॅम 440 मध्ये एअर/ऑइल-कूल्ड, 443 सीसी, सिंगल-सिलेंडर इंजिन वापरलं आहे, जे 25 बीएचपी पॉवर आणि 34 एनएम पीक टॉर्क निर्माण करतं. हे मोठे इंजिन कंपनीच्या सध्याच्या 411 सीसी इंजिनपासून बनवलं आहे, ज्यामध्ये बोअर 3 मिमीनं वाढवला ​​आहे. रॉयल एनफिल्डनं नवीन स्क्रॅम 440 चं इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलं आहे, तर 411सीसी इंजिन 5-स्पीड युनिटसह जोडलं आहे. कंपनीचे म्हणणे आहे की त्यांनी SOHC व्हॉल्व्हट्रेनमध्ये सुधारणा करून NVH पातळी कमी करण्याचं काम केलं आहे.

रॉयल एनफील्ड स्क्रॅम 440 चं हार्डवेअर
रॉयल एनफिल्डनं स्क्रॅम 440 च्या चेसिसलाही बळकटी दिली आहे. आता मोटरसायकलच्या मागील बाजूस टॉप बॉक्स बसवता येतोय. या टॉप बॉक्सचा एकूण पेलोड 10 किलो आहे. स्क्रॅम 440 च्या दोन्ही प्रकारांमध्ये स्विचेबल एबीएस आणि एलईडी हेडलाइट मानक म्हणून प्रदान केले आहेत. मोटरसायकलमध्ये 15-लिटर इंधन टाकी असून दुचाकीचं वजन 197 किलो आहे, जे स्क्रॅम 411पेक्षा 2 किलो जास्त आहे.

रॉयल एनफील्ड स्क्रॅम 440 चे रंग पर्याय
कंपनीनं मोटरसायकलचे दोन्ही प्रकार पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करून दिले आहेत, ज्यामध्ये बेस ट्रेल प्रकारासाठी निळा आणि हिरवा आणि टॉप फोर्स प्रकारासाठी निळा, निळसर आणि राखाडी रंगाचा समावेश आहे. 2.08 लाख ते 2.15 लाख रुपयांच्या दरम्यान (एक्स-शोरूम, चेन्नई) किंमत असलेली, नवीन स्क्रॅम 440 सध्याच्या स्क्रॅम 411 पेक्षा 2000 ते 3000 रुपयानं महाग आहे.

हे वाचलंत का :

  1. Realme 14 Pro 5G सीरीजचा पहिला सेल सुरू, फोनच्या खरेदीवर मिळतेय 4000 हजारांची सूट
  2. Samsung Galaxy S25 Edge लवकरच लॉंच होणार, कंपनीनं टीझर केला जारी
  3. जागतिक स्तरावर ChatGPT डाऊन, वापरकर्त्यांना आउटेजचा करावा लागतोय सामना

ABOUT THE AUTHOR

...view details