ETV Bharat / technology

रे बॅन्स स्मार्ट ग्लासेसची गेल्या वर्षी 10 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री - RAY BAN SMART GLASS SALE २०२४

मेटानं रे बॅन्स स्मार्ट ग्लासेसची गेल्या वर्षी 10 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केलीय, अशी माहिती मेटाचे (फेसबुक) सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी दिलीय.

Ray Bans smart glasses
रे बॅन्स स्मार्ट ग्लासेस (Ray Bans)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Feb 3, 2025, 4:28 PM IST

हैदराबाद : मेटाचे (फेसबुक) सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी कंपनीच्या रेबॅन स्मार्ट ग्लासेसच्या विक्रीची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं की 2024 मध्ये कंपनीनं 10 लाखांहून अधिक युनिट्स स्मार्ट ग्लासेसची व्रिक्री केलीय. मात्र, स्मार्ट ग्लासेस अद्याप भारतासह अनेक प्रदेशांमध्ये लाँच झालेलं नाही.

50 लाख युनिट्सच्या विक्रीचं लक्ष
मार्क झुकरबर्ग यांनी 2025 मध्ये 50 लाख युनिट्स ग्लासेसची विक्री करण्याचं लक्ष ठेवलं आहे. 2023 मध्ये कंपनीनं पहिल्यांदाच हा स्मार्ट ग्लास लाँच केला होता. लाँच झाल्यानंतर, त्यात सतत नवीन वैशिष्ट्ये जोडली जात आहेत. हे चष्मे मल्टीमॉडल एआयसह येतात, जे तुम्ही पाहत असलेल्या, ऐकत असलेल्या आणि वाचत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर प्रक्रिया करतात. त्यात लाईव्ह एआय ट्रान्सलेशनची सुविधा देखील उपलब्ध आहे.

नवीन स्मार्ट चष्मे लाँच होणार
कंपनी 2025 मध्ये नवीन स्मार्ट चष्मे लाँच करू शकते, ज्यामध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये दिली जातील. कंपनी नवीन प्रदेशांमध्येही आपलं उत्पादन लाँच करेल. मेटा ग्लास सध्या भारतात उपलब्ध नाही. त्यात एक कॅमेरा बसवलेला आहे, जो तुमच्यासाठी लाईव्ह व्हिडिओ तयार करू शकतो. याशिवाय, तुम्ही हा ग्लास ब्लूटूथशी कनेक्ट करू शकता आणि कॉलिंग आणि इतर कारणांसाठी वापरू शकता. हे उपकरण तंत्रज्ञान क्षेत्रात खूप लोकप्रिय झालं आहे. भारतातील बरेच लोक हे ग्लासेस खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत. मेटा 2025 मध्ये रे-बॅन स्मार्ट ग्लासेसची नवीन आवृत्ती लाँच करण्याची तयारी करत आहे.

विविध वैशिष्ट्ये जोडणार
या नवीन चष्म्यांमध्ये एक डिस्प्ले जोडला जाईल जो वापरकर्त्यांना सूचना दाखवण्यास आणि मेटाच्या एआयशी संवाद साधण्यास अनुमती देईल. हा डिस्प्ले केवळ सूचनाच दाखवत नाही तर नेव्हिगेशन, फोन/स्मार्टवॉच सूचना आणि इतर माहिती देखील अशी शक्यता आहे. सध्या, रे-बॅन मेटा स्मार्ट चष्मा वापरकर्त्यांना व्हॉइस असिस्टंटच्या मदतीनं हातचा वापर न करता संदेश पाठवण्याची, कॉल करण्याची आणि इतर कामे करण्याची परवानगी देतो. या चष्म्यांमध्ये बिल्ट-इन स्पीकर्स आहेत, जे ऑडिओ सूचना आणि व्हॉइस असिस्टंटला देखील प्रतिसाद देतात. हे चष्मे क्लासिक रे-बॅन शैलीमध्ये डिझाइन केलेले आहेत, ज्यामुळे ते स्टायलिश आणि सोयीस्कर बनतात. ते ब्लूटूथद्वारे स्मार्टफोनशी कनेक्ट होतात आणि काही मॉडेल्समध्ये एक लहान कॅमेरा देखील असतो, जो फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करण्यास अनुमती देतो. 2025 मध्ये येणाऱ्या स्मार्टग्लासेसमध्ये डिस्प्ले जोडला जाईल, ज्यामुळे वापरकर्त्यांना अधिक इमर्सिव्ह आणि हँड्स-फ्री अनुभव मिळेल.

हे वाचलंत का :

  1. BSNL चा 1499 रुपयांचा नवीन रिचार्ज प्लॅन लाँच, 336 दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉलिंग आणि 24 जीबी डेटा
  2. Vivo V50 भारतात लाँच होण्यासाठी सज्ज, जाणून घ्या अपेक्षित किंमत, फीचर, लॉंच तारीख
  3. Honor X9c 5G लवकरच होणार लाँच, 108MP कॅमेरा आणि 6600mAh बॅटरीनं सुसज्ज, अ‍ॅमेझॉनवर लँडिंग पेज लाईव्ह

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.