हैदराबाद : आज एक नवीन 5G स्मार्टफोन तुमच्यासाठी भारतीय बाजारपेठेत धमाकेदार एंट्री करेल. जर तुम्ही देखील बजेट सेगमेंटमध्ये नवीन 5G फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही Redmi आज लॉंच होणारा फोन खरेदी करु शकता. Redmi 14c 5G फोनची किंमत अधिकृत लॉंचपूर्वी लीक झाली होती आणि कंपनीनं या फोनमध्ये उपलब्ध असलेल्या खास वैशिष्ट्यांची खात्री देखील केली आहे. लॉंच झाल्यानंतर हा फोन Mi.com व्यतिरिक्त Flipkart आणि Amazon वरून खरेदी करता येईल.
Redmi 14C 5G ची भारतातील किंमत (अपेक्षित) :अलीकडेच, टिपस्टर अभिषेक यादव यांनी या रेडमी फोनच्या किंमतीशी संबंधित तपशील लीक केली होती. लीकनुसार, या फोनच्या 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 13 हजार 999 रुपये असू शकते. लीकमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की बँक ऑफरनंतर हा फोन 10 हजार 999 रुपये किंवा 11 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध होऊ शकतो. जर हा Redmi फोन या किंमतीच्या श्रेणीमध्ये लॉंच केला गेला, तर हा फोन Vivo T3x 5G आणि Motorola G45 5G फोनशी स्पर्धा करेल. Vivo फोनची किंमत 12 हजार 499 रुपयांपासून सुरू होते आणि Motorola फोनची किंमत 12 हजार 999 रुपयांपासून सुरू होते.