ETV Bharat / technology

डुकाटी 2025 मध्ये 14 बाइक करणार लॉंच - DUCATI TO LAUNCH 14 NEW BIKES

Ducati to launch 14 new bikes : नवीन वर्षात अनेक दुचाकी त्यांच्या नवीन उत्पादनांसह बाजारात दाखल होणार आहेत. डुकाटी यावर्षी 14 मोटारसायकली बाजारात आणणार आहे.

Ducati
डुकाटी (Ducati)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Jan 8, 2025, 4:45 PM IST

हैदराबाद Ducati to launch 14 new bikes : इटालियन कंपनी डुकाटी 2025 मध्ये भारतात 14 नवीन मोटारसायकली लाँच करणार आहे. यावर्षी अनेक बाईक आणि कार लॉंच होणार आहेत. त्याचवेळी, डुकाटी या वर्षी भारतीय बाजारपेठेत एक-दोन नव्हे तर 14 मोटरसायकल बाजारात उतरवणार आहे. त्यामुळं प्रत्येक महिन्यात डुकाटीचं नवीन मॉडेल बाजारात येऊ शकतं. नवीन मॉडेल्स लाँच करण्यासोबतच बाईक कंपनी आपल्या डीलर नेटवर्कचाही विस्तार करणार आहे.

डुकाटी 14 मोटारसायकल लॉंच करणार
DesertX Discovery आणि Ducati ची सुपरस्पोर्ट बाईक Panigale V4 वर्ष 2025 च्या पहिल्या तीन महिन्यांत लाँच केली जाईल. त्याच वेळी, Panigale V2 फायनल एडिशन आणि Scrambler Dark पुढील तीन महिन्यांत बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. पहिल्या सहा महिन्यांत या चार बाइक्स बाजारात दाखल होणार आहेत.

कोणत्या दुचाकी होणार लॉंच
जुलै ते सप्टेंबर दरम्यान भारतीय बाजारपेठेत पाच बाईक लॉंच केल्या जातील. या बाईकच्या यादीत सर्व-नवीन 890 cc मल्टीस्ट्राडा V2 आणि Scrambler Rizoma ची नावं समाविष्ट आहेत. यासोबतच Streetfighter V4, Streetfighter, V2 आणि Panigale V2 देखील बाजारात येणार आहेत. डुकाटी डिसेंबर 2025 मध्ये बाजारात अनेक नवीन बाइक्स लाँच करण्याची योजना आखत आहे. या नवीन बाइक्सबद्दल अधिक तपशील काही दिवसातच समोर येईल.

डुकाटी नेटवर्कचा विस्तार
भारतीय बाजारपेठेत कंपनीची विक्री वाढवण्यासाठी डुकाटी या वर्षी आपल्या डीलर नेटवर्कचा विस्तार करणार आहे. सध्या डुकाटी शोरूम फक्त मेट्रो शहरांमध्ये उपलब्ध आहेत. डुकाटीच्या डीलर नेटवर्कबद्दल बोलायचं झाल्यास, या कंपनीचे शोरूम दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोची, कोलकाता, चंदीगड आणि अहमदाबादमध्ये आहेत. नवीन बाईक लाँच केल्यामुळं डुकाटी शोरूमची संख्या वाढवणार आहे.

हे वाचलंत का :

  1. Poco X7 आणि X7 Pro उद्याच होणार लॉंच, कुठं पाहणार लाइव्ह?, अपेक्षित किंमत, डिझाइन, वैशिष्ट्ये जाणून घ्या...
  2. डॉ. व्ही. नारायणन इस्रोचे नवीन प्रमुख, 14 जानेवारी रोजी सोमनाथ यांच्याकडून स्वीकारणार पदभार
  3. OnePlus 13 आणि OnePlus 13R वर विशेष ऑफर, कुठं मिळतेय सूट?

Conclusion:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.