हैदराबाद Realme C75 : Realme नं आपला नवीन स्मार्टफोन Realme C75 लॉंच केलाय आहे. या C75 फोनमध्ये 6.72-इंचाचा IPS LCD असून MediaTek Helio G92 Max प्रोसेसर आहे. आज आम्ही तुम्हला Realme C75 चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, किंमत इत्यादींबद्दल तपशीलवार माहिती देत आहोत.
गोल्ड आणि ब्लॅक स्टॉर्म नाईट रंगांमध्ये लॉंच : Realme C75 व्हिएतनाममध्ये लाइटनिंग गोल्ड आणि ब्लॅक स्टॉर्म नाईट रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे. मात्र, किंमतीची माहिती अद्याप समोर आलेली नसून, हा फोन परवडणारा किंमतीत लॉंच झाल्याची शक्यता आहे. कंपनी लवकरच C75 ला जागतिक मार्केटमध्ये देखील आणू शकते.
Realme C75 फीचर : Realme C75 मध्ये 6.72-इंचाचा IPS LCD आहे. ज्यामध्ये फुल एचडी प्लस रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश दर आहे. हा स्मार्टफोन MediaTek Helio G92 Max चिपसेटनं सुसज्ज आहे. C75 त्याच्या मजबूत बिल्ड गुणवत्तेमुळं अधिक चांगला दिसतोय. फोनमध्ये आर्मर्शेल टेम्पर्ड ग्लास स्क्रीनसह एक प्रभाव-शोषक डिझाइन असून फोन खाली पडल्यास सहज सहन करू शकतं, असं Realme नं म्हटलं आहे. पाणी आणि धूळीपासून संरक्षण मिळण्यासाठी फोन IP69 रेटिंगनं सुसज्ज आहे. याशिवाय, मिलिटरी-ग्रेड शॉक रेझिस्टन्स MIL-STD-810H प्रमाणन फोनला अतिरिक्त टिकाऊपणा प्रदान करतं.
45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट :कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर C75 मध्ये मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आहे. त्याचबरोबर समोर 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Realme UI 5.0 वर काम करतो. या फोनमध्ये 6,000mAh बॅटरी आहे जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे रिव्हर्स चार्जिंगला देखील समर्थन देते, त्यामुळे ते पॉवर बँक म्हणून काम करू शकते. तुम्ही फोनवरून इतर डिव्हाइस देखील चार्ज करू शकता.
हे वचालंत का :
- नोकिया कंपनीचा HMD Fusion 5G स्मार्टफोन भारतात लॉंच, जाणून घ्या अप्रतिम फीचर्स
- Realme GT 7 Pro भारतात लॉंच, स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटसह 5,800mAh बॅटरी, फोनवर तीन हजारांची सवलत
- OPPO Pad 3 टॅबलेट लॉंच, स्पेसिफिकेशन्स, किंमत इत्यादींबद्दल तपशीलवार जाणून घेऊया...