हैदराबाद : OpenAI, ChatGPT वापरकर्त्यांना आउटेज सामना करावा लागतोय. याबाबत कंपनीनं या समस्येचं निराकरण करण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट केलीय. “आम्ही सध्या आउटेज अनुभवत आहोत. आम्ही आउटेजची समस्या ओळखली आहे. या समस्येचं निराकरण करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. आम्ही तुम्हाला अपडेट सांगू”, असं कंपनीनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस :ChatGPT ला आउटेज येत असल्यानं सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. गेल्या महिन्यात, चॅटजीपीटी 30 मिनिटांसाठी बंद झालं होतं. त्यानंतर ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी X वर माफी मागितली होती. आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट डाउनडिटेक्टरनुसार, चॅटबॉटच्या अनुपलब्धतेमुळं 19,000 हून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. एक्स वरील पोस्टमध्ये आउटेज मान्य करताना, ऑल्टमन म्हणाले होते की कंपनी पूर्वीपेक्षा विश्वासार्हतेमध्ये खूप चांगलं काम करतेय, मात्र अजून बरेच काम आम्हाला करायचं आहे.