ETV Bharat / health-and-lifestyle

जागतिक कडधान्य दिवस: जाणून घ्या कडधान्य खाण्याचे फायदे - WORLD PULSES DAY 2025

दरवर्षी 10 फेब्रुवारी रोजी जागितक कडधान्य दिन साजरा केला जातो. मानवी आहारामध्ये डाळींना अनन्यसाधारण महत्व आहे. जाणून घ्या या दिवसाचे महत्व, इतिहास, थीम आणि फायदे.

WORLD PULSES DAY 2025  WORLD PULSES DAY  HEALTH BENEFITS OF PULSES  WORLD PULSES DAY HISTORY
कडधान्य खाण्याचे फायदे (Freepik)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Feb 10, 2025, 3:06 PM IST

World Pulses Day 2025: दरवर्षी 10 फेब्रुवारी रोजी जागतिक कडधान्य दिवस साजरा केला जातो. लोकांना डाळीचं महत्त्व पटवून देण्यासाठी तसंच पोषण आणि अन्नसुरक्षेसाठी कडधान्याची भूमिका किती महत्त्वाची आहे हे सांगण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मानवी आहारामध्ये डाळीला अनन्यसाधारण महत्व आहे. परंतु आजकाल लोकांचा कल फास्ट फूडकडे आहे. यामुळे पाहिजे त्या प्रमाणात आहारात डाळींचा वापर होत नाहीये. परिणामी शरीराल पोषण घटक मिळत नाही. याचे दुष्परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. विशेषता: मुलं आणि तरूणांच्या आरोग्यावर याचा जास्त परिणाम होत आहे.

WORLD PULSES DAY 2025  WORLD PULSES DAY  HEALTH BENEFITS OF PULSES  WORLD PULSES DAY HISTORY
कडधान्य खाण्याचे फायदे (Freepik)
  • जागतिक कडधान्य दिनाचा इतिहास: 2013 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने जागतिक कडधान्य दिवस साजरा करण्याच्या करार केला आणि 2016 मध्ये पहिल्यांदा जागतिक कडधान्य दिवस साजरा करण्यात आला. दरवर्षी संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषि संघटनेद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

  • यंदाची थीम: दरवर्षी वेगवेगळ्या थीमनुसार जागतिक कडधान्य दिवस साजरा करतात. डाळी: कृषि अन्न प्रणालींमध्ये विविधता आणणे ही या वर्षीची थीम आहे.

  • कडधान्य खाण्याचे फायदे: वजन कमी करण्यासाठी बहुतांश लोक सकाळच्या नाश्त्यात कडधान्य घेतात. कडधान्यामध्ये मुबलक प्रमाणात खनिजे तसंच पोषक घटक असतात. कडधान्य खाल्ल्यानं शरीराला अनेक फायदे होतात. शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी कडधान्य महत्त्वाची भूमिका बजावतात. मोड आलेली कडधान्य खाल्ल्यास जीवनसत्त्व क मिळतो. तसच फोलेट, मॅग्नेशियम, जीबनसत्व बी3, पोटॅशियम, जस्त, लोह, यासारखे पोषक घटक डाळींच्या सेवनातून मिळतात.
  • मसूर: मसूर डाळीमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई मुबलक प्रमाणात आढळतात. तसंच अँटीऑक्सिडंट्स आणि प्रोटीन यामुळे डोळ्यांचे आरोग्य चागंल राहते. यात असलेल्या कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरसमुळे हाडांच आरोग्य चांगलं राहतं. ऑस्टिओपोरोसिस सारखा धोका देखील मसूर डाळ खाल्ल्यानं कमी होवू शकते. पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी देखील मसूर डाळ चांगली आहे.
  • मूंगडाळ: पोषणतज्ञ डॉ. जानकी श्रीनाथ यांच्या मते, मूंगडाळ सुपरफूड आहे. मधुमेही रुग्णांनी मूंग डाळ खाल्ल्यास डाळीमधील असलेले गुणधर्म रक्तातील साखर संतुलित करते. तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर डॉक्टरांच्या साल्लायनुसार आहारत मूंग डाळीचा समावेश करा. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मूंग डाळ फायदेशीर आहे. तसंच मूंग डाळीच्या सेवनानं गॅस, बद्धकोष्ठता अशा समस्या देखील कमी होतात
  • तूरडाळ: तुरडाळमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळतात. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी तुरीची डाळ चांगली आहे. गरोदर महिलांनी तुळीच्या डाळीचं सेवन करावं. यात असलेले फोलिक अ‍ॅसिड गर्भाचा विकास होण्यासाठी महत्तावचे आहेत.
  • हरभरा: हरभऱ्याच्या डाळीतील एल ट्रिप्टोफॅन मूड सुधारण्यास मदत करते. तसंच भावनिक संतुलन सुधारण्यास देखील हरभऱ्याची डांग फायदेशीर आहे. हरभरा डाळीमध्ये इतर डाळींच्या तुलनेत जास्त प्रतिथे आढळतात.
कडधान्य कॅलरी प्रोटीन कार्बोहाइड्रेटफायबर चांगलं फॅट
मूंग 347 कॅलरी23.9 ग्रॅम62.6 ग्रॅम 16.3 ग्रॅम 1.2 ग्रॅम
राजमा 164 कॅलरी8.86 ग्रॅम27.4 ग्रॅम7.6 ग्रॅम0.5 ग्रॅम
हरभरा डाळ 164 कॅलरी8.86 ग्रॅम27.4 ग्रॅम7.6 ग्रॅम0.5 ग्रॅम
तूरडाळ 343 कॅलरी21.7 ग्रॅम62.78 ग्रॅम15 ग्रॅम1.49
मसूर डाळ 352 कॅलरी24.4 ग्रॅम Data not available 10.7 ग्रॅम1.06 ग्रॅम
उडदाची डाळ 341 कॅलरी25.2 ग्रम 58.99 ग्रॅम18.3 ग्रॅम1.64 गॅम

संदर्भ

https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/25061763/

https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC11124391/

https://www.sciencedirect.com/science/article/pii/S2772502222001317

https://www.mdpi.com/2072-6643/16/10/1435

हेही वाचा

  1. मासिक पाळी पासून संधिवाताच्या वेदना कमी करण्यासाठी ओवा फायदेशीर
  2. ऑम्लेट की उकडलेली अंडी? आरोग्यासाठी काय आहे सर्वोत्तम
  3. मानसिक आरोग्यासह त्वचा उजळणारे 'हे' पेय एकदा पिऊन बघा
  4. सावधान! तुम्हाला 'ही' लक्षणं जाणवत असतील तर मुत्रपिंड होऊ शकतं निकामी
  5. वारंवार विसरण्याच्या सवयीनं परेशान आहात? आजच ट्राय करा 'ही' पद्धत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.