ETV Bharat / technology

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामच्या कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड, शेकडो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार - META LAYOFFS

Job Cut In Meta : फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामची मूळ कंपनी आजपासून कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यास सुरुवात करणार आहे

Facebook, WhatsApp, Instagram
फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम (Etv Bharat File photo)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Feb 10, 2025, 11:01 AM IST

हैदराबाद Job Cut In Meta : फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामच्या कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. कारण मेटानं सोमवारी सकाळी प्लॅटफॉर्मवरील शेकडो कर्मचाऱ्यांसाठी वाईट दिली. आज पहाटे 5 वाजल्यापासून कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या सूचना जारी झाल्या आहेत. वाईट कामगिरी करण्याच्या नावाखाली कंपनी कर्मचाऱ्यांना काढणार आहे. यात सर्वात कमी कामगिरी करणारे जवळपास 5% कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

Meta layoffs : फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटा सोमवारी सकाळी प्लॅटफॉर्मवरील शेकडो कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी घेऊन आली. मार्क झुकरबर्गची कंपनी सोमवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे 5 वाजल्यापासून कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या सूचना जारी करत आहे. मात्र, यावेळी मेटाचं कार्यालय बंद राहणार नाही. याबाबत कंपनी कोणतेही निवेदन जारी करणार नाही. ही कपात जागतिक स्तरावर केली जाईल, परंतु जर्मनी, फ्रान्स, इटली आणि नेदरलँडमधील कर्मचाऱ्यांना स्थानिक नियमांमुळं याचा फटका बसणार नाहीय. 11 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान युरोप, आशिया आणि आफ्रिकेतील डझनभर देशांमधील कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठवल्या जातील. मेटाच्या हेड ऑफ पीपल जेनेल गेल यांनी लिहिलेल्या पोस्टनुसार, बहुतेक देशांमध्ये सोमवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 5 वाजल्यापासून कर्मचाऱ्यांना नोटिसा पाठवल्या जात आहेत. मात्र, दुसरीकडं कंपनी मेटा मशीन लर्निंग अभियंते आणि इतर प्रमुख पदासाठी भरती करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे, असं बिझनेस टुडेनं म्हटलं आहे.

गुगल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन आणि स्ट्राइपमध्येही कपात
नोकरी कपातीचा हा ट्रेंड केवळ मेटापुरता मर्यादित नाही. 2025 मध्ये गुगल, मायक्रोसॉफ्ट, अमाझोन आणि स्ट्राइप सारख्या इतर टेक दिग्गजांनीही त्यांचे कर्मचारी कमी केले आहेत. गुगलनं त्यांच्या यूएस प्लॅटफॉर्म आणि डिव्हाइस टीममधील कर्मचाऱ्यांसाठी एक स्वैच्छिक एक्झिट प्रोग्राम सुरू केला आहे. मायक्रोसॉफ्टनं कामगिरीवर आधारित नोकऱ्या कपात करण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे, निवृत्ती पॅकेजेसशिवाय कमी कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे. ॲमेझॉननं त्यांच्या फॅशन आणि फिटनेस विभागात सुमारे 200 कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे. स्ट्राइपनं उत्पादन, इंजिन, रिंग आणि ऑपरेशन्समध्ये सुमारे 300 कर्मचाऱ्यांना काढून टाकलं आहे.

हे वाचलंत का :

  1. मार्क झुकरबर्ग यांच्या टीकेवर मेटा इंडियानं मागितली माफी, वाचा काय आहे प्रकरण?
  2. स्वतःचं AI सर्च इंजिन तयार करतंय मेटा, Google ला देणार टक्कर?
  3. Meta ची Scam se Bacho मोहीम सुरू, ऑनलाइन घोटाळ्यांबाबत शिक्षित करणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.