हैदराबाद OpenAI chatgpt down :गुरुवारी सकाळी मोठ्या जागतिक बंदनंतर ओपनएआयनं त्याच्या लोकप्रिय चॅटबॉट चॅटजीपीटीच्या सेवा यशस्वीरित्या पुन्हा सुरू केल्या आहेत. पहाटेच्या या बंदमुळं लाखो लोकांना सुमारे तीन तास सेवा मिळू शकली नाही. गुरुवारी संध्याकाळी 7:00 pm ET (5:30 am IST) च्या काही वेळापूर्वी, ChatGPT मध्ये लॉग इन करणाऱ्या वापरकर्त्यांना सेवा उपलब्ध नसल्याचं सांगणारा एक त्रुटी संदेश प्राप्त झाला होता. ChatGPT च्या निर्मात्या OpenAI नं त्याबद्दल X वर पोस्ट केली होती आहे. कंपनीनं पोस्ट करत म्हटलं होतं की, 'आम्ही सध्या आउटेज अनुभवत आहोत. आम्ही समस्या ओळखली आहे. तिचं निराकरण करण्यासाठी काम करत आहोत.
चॅटबॉटच्या सेवा आता पुन्हा सुरू :चॅटबॉटच्या सेवा आता पुन्हा सुरू झाली आहे. वापरकर्ते ChatGPT आणि इतर OpenAI सेवांमध्ये प्रवेश करू शकतात. गेल्या महिन्यात चॅटजीपीटी अर्ध्या तासासाठी बंद पडलं होतं. मात्र, त्यानंतर ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी चॅटजीपीटी 30 मिनिटांसाठी डाउन झाल्यानंतर X वर माफी मागितली. आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट डाउनडिटेक्टरच्या मते, चॅटबॉटच्या सेवा बंद झाल्यामुळं 19,000 हून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. X वरील आउटेजची कबुली देणाऱ्या एका पोस्टमध्ये, ऑल्टमन म्हणाले की कंपनी विश्वासार्हतेच्या बाबतीत पूर्वीपेक्षा खूप चांगली आहे, परंतु अद्याप बरेच काम करणं बाकी आहे.