ETV Bharat / technology

स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 आणि ड्युअल कॅमेऱ्यासह iQOO Neo 10R लवकरच लॉंच होणार, जाणून घ्या सर्व तपशील - IQOO NEO 10R LAUNCHED IN INDIA SOON

iQOO Neo 10R लवकरच भारतात लाँच होण्याची अपेक्षा आहे. प्रोसेसर आणि डिझाइनबदलासह फोनमध्ये काय असेल खास, जाणून घेऊया...

iQOO Neo 10R
iQOO Neo 10R (iQOO)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Jan 28, 2025, 1:33 PM IST

हैदराबाद iQOO Neo 10R : स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 आणि ड्युअल कॅमेऱ्यासह iQOO Neo 10R भारतात लवकरच लॉंच होणार आहे. iQOO इंडियाच्या टीझरमध्ये फोनची रचना दाखवण्यात आली आहे, ज्यामध्ये निळ्या-जांभळ्या आणि पांढऱ्या रंगांच्या मिश्रणासह ड्युअल-टोन बॅक आहे. iQOO Neo 10R भारतीय बाजारात लवकरच लाँच होणार आहे. iQOO नं आता फोनबद्दल एक टीझर रिलीज केलाय. टीझरमध्ये अनेक फोनच्या तपशीलांची पुष्टी झालीय आहे.

iQOO Neo 10R टीझर
iQOO नं एक टीझर रिलीज केला आहे, ज्यामध्ये हा फोन स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 द्वारे समर्थित असेल याची पुष्टी झाली आहे. टीझरमध्ये मार्केटिंग कंपनीनं "सेगमेंटमधील सर्वात वेगवान स्मार्टफोन", अशी टॅगलाइन देखील वापरली आहे. हा फोन भारतात 30,000 हजारांच्या किमतीच्या आसपास लाँच होणारी शक्यता आहे.

प्राथमिक कॅमेरा 50MP
टीझरमध्ये फोनची रचना देखील उघड झाली आहे, ज्यामध्ये जांभळ्या रंगाच्या रंगछटांच्या मिश्रणासह ड्युअल-टोन बॅक दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये वाइड आणि अल्ट्रा-वाइड कॉन्फिगरेशन असलेले ड्युअल-कॅमेरा सेटअप दिसतंय. यात प्राथमिक कॅमेरा 50MP सोनी IMX600 सेन्सर असू शकतो, तर अल्ट्रा-वाइड शूटरमध्ये 8MP सेन्सर असू शकतो.

iQOO Neo 10R मध्ये काय असेल खास?
या महिन्याच्या सुरुवातीला, टिपस्टर पारस गुग्लानीनं डिव्हाइसबद्दल अनेक तपशील उघड केले होते. iQOO Neo 10R मध्ये 144 Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती. या डिव्हाइसच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8GB रॅम आणि टॉप-एंड व्हेरिएंटमध्ये 12GB रॅम असण्याची अपेक्षा आहे, सर्व मॉडेल्समध्ये 256 GB स्टोरेज उपलब्ध असण्याची शक्यता आहे.

6,400 mAh बॅटरी
फोनमध्ये 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 6,400 mAh बॅटरी असेल. रंग पर्यायांच्या बाबतीत, iQOO Neo 10R दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असल्याचं म्हटले जातंय. यात ब्लू व्हाइट स्लाइस आणि लूनर टायटॅनियम रंगाचा समावेश असेल. शिवाय, हा फोन फेब्रुवारी 2025 मध्ये लाँच होऊ शकतो.

हे वाचलंत का :

  1. ChatGPT सह AI जगाला हादरवून टाकणारे चिनी AI मॉडेल, DeepSeek काय आहे?
  2. टिकटॉक खरेदी करण्यासाठी मायक्रोसॉफ्टची चर्चा सुरू, इतर कंपन्यांनी बोली लावण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा
  3. UPI वापरकर्त्यांनो सावधान! 'हा' पर्याय ताबडतोब करा बंद, अन्यथा तुमचं खातं होणार रिकामं

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.