हैदराबाद :भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सतत वाढलीय. त्यामुळं, वाहन उत्पादक कंपन्या आता स्कूटर तसंच बाईकची नवीन उत्पादनं लाँच करत आहेत. आता ओला इलेक्ट्रिक उद्या इलेक्ट्रिक बाइक्स लाँच करण्याची तयारी करत आहे. जाणून घेऊया फीचर्स आणि रेंज दुचाकीची रेंज या बातमीतून...
ओला इलेक्ट्रिक नवीन बाईक आणणार
ओला इलेक्ट्रिक भारतीय बाजारात उद्या नवीन बाईक लाँच करणार आहे. कंपनीकडून नवीन बाईक्स औपचारिकपणे ५ फेब्रुवारी २०२५ रोजी लाँच करणार आहे. कंपनीनं सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. लॉंच कार्यक्रम तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर https://www.youtube.com/live/efx8pc7tjpE लाईव्हु पाहू शकता.
कोणत्या बाइक्स लाँच होणार?
कंपनीनं सोशल मीडियावर काही टीझर जारी केले आहेत, त्यानुसार OLA रोडस्टर X औपचारिकपणे लाँच केले जाईल. यासोबतच आणखी काही बाइक्स बाजारात आणल्या जाऊ शकतात. याआधीही कंपनीचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी ओला रोडस्टर एक्स बाईकबाबत काही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहेत. ज्यामध्ये ते बाईक चालवताना दिसत आहेत. यानंतर आता आणखी एक टीझर रिलीज झाला आहे. ज्यामध्ये बाईकच्या नावासह तारखेची माहिती दिली आहे.
काय असेल खास?
कंपनीनं लाँच केलेल्या नवीन बाईकमध्ये अनेक उत्तम फीचर्स असतील. ओला रोडस्टर एक्स ही एक एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक बाईक असेल जी सीबीएस, डिस्क ब्रेक, स्पोर्ट्स, नॉर्मल, इको रायडिंग मोड्स, ओला मॅप टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, ओटीए अपडेट्स, डिजिटल की लॉक सारख्या वैशिष्ट्यांसह येईल.
बॅटरी किती शक्तिशाली आहे?
एंट्री-लेव्हल बाईक म्हणून लाँच केलेली, रोडस्टर एक्स २.५, ३.५ आणि ४.५ किलोवॅट प्रति तास क्षमतेच्या बॅटरीनं सुसज्ज आहे. यासह, रोडस्टर एक्सचा टॉप व्हेरिएंट २०० किलोमीटरपर्यंत रेंज देईल, असं कंपनीचं म्हणणे आहे.
किती असेल किंमत?
१५ ऑगस्ट २०२४ रोजी ओलानं एक कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यामध्ये अनेक बाईक दाखवण्यात आल्या. यावेळी कंपनीकडून या बाईकच्या किंमतीची माहितीही देण्यात आली. त्यानुसार ओला रोडस्टर एक्स ७५ हजार रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत आणली जाऊ शकते.
हे वचालंत का :
- भारतीय रेल्वेनं केलं स्वारेल अॅप लाँच, आयआरसीटीसी अॅप होणार बंद?
- ओलानं 320 किमी रेंजसह जेन 3 इलेक्ट्रिक स्कूटर्स केल्या लाँच, किंमत, वैशिष्ट्ये, श्रेणी, इतर तपशील जाणून घ्या...
- हत्तीचं बळ असणारा 'महिंद्रा वीरो' सीएनजी लॉंच, १.४ टन लोड घेण्याची क्षमता