हैदराबादMotorola Edge 50 Neo Launched: स्मार्टफोन कंपनी Motorola नं Edge 50 सीरीजचा नवीन स्मार्टफोन Motorola Edge 50 Neo भारतात लॉन्च केला आहे. लाइनअपमधील हा पाचवा फोन आहे. याआधी एज 50, एज 50 प्रो, एज 50 फ्यूजन आणि एज 50 अल्ट्रा बाजारात लॉन्च झाले आहेत. मुख्य वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Edge 50 Neo मध्ये LTPO डिस्प्ले आणि 68W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. या मोबाईल फोनमध्ये 30X AI झूम आणि Moto AI चा सपोर्ट असेल. याशिवाय पुढील पाच वर्षांसाठी हँडसेटला सॉफ्टवेअर अपडेट्स दिले जातील.
Motorola Edge 50 Neo फिचर: Motorola Edge 50 Neo लेदर फिनिशसह उरलब्ध झाला आहे. या फोनला MIL-810H मिलिटरी ग्रेड ड्युरेबिलिटी प्रमाणपत्र मिळालं आहे. म्हणजे हा फोन खूप मजबूत आहे. या मोबाईल फोनमध्ये 6.4 इंचाचा सुपर HD LTPO डिस्प्ले आहे. त्याची कमाल चमक 3000 nits आहे. यात MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर आणि 256GB इंटरनल स्टोरेज आहे. यात एआय स्टाइल सिंक आणि एआय मॅजिक कॅनव्हास सारखी एआय वैशिष्ट्ये देखील आहेत.
कॅमेरा : Edge 50 Neo मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. OIS सपोर्टसह 50MP प्राथमिक कॅमेरा आहे. दुसरा 10MP टेलिफोटो कॅमेरा असून तिसरा 13MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये 32MP कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी :नवीन 5G स्मार्टफोनमध्ये 4310mAh बॅटरी आहे, जी 68W फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगसह सुसज्ज आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, यात ड्युअल सिम स्लॉट, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे.