हैदाराबाद : New Audi Q7 launched in India : ऑडी कंपनीनं काही दिवसांपूर्वी लक्झरी SUV ऑडी Q7 फेसलिफ्टसाठी बुकिंग सुरू केली होती. आता कंपनीनं तिचं उत्पादन छत्रपती संभाजीनगर प्लांटमध्ये सुरू केलं आहे. ऑडी Q7 फेसलिफ्ट SUV मध्ये बहुतांश कॉस्मेटिक बदल देण्यात आले आहेत. यात नवीन OLED हेडलॅम्पसह सिग्नेचर दिवे, नवीन ग्रिलवर क्रोम आणि अनेक डिझाईन्सचे बंपर आहेत.
2025 ऑडी Q7 फेसलिफ्ट लॉंच : ऑडी इंडियानं नवीन Q7 फेसलिफ्ट SUV लॉंच केली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 88.66 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. 2015 मध्ये सादर करण्यात आलेल्या सध्याच्या मॉडेलची हा दुसरी फेसलिफ्ट आहे. कंपनीनं काही दिवसांपूर्वी लक्झरी एसयूव्हीसाठी बुकिंग घेण्यास सुरुवात केली होती. आता कारचं उत्पादन महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीगर (औरंगाबाद) प्लांटमध्ये देखील सुरू झालं आहे. ऑडी Q7 फेसलिफ्ट SUV मध्ये बहुतांश कॉस्मेटिक बदल देण्यात आले आहेत. यात नवीन OLED हेडलॅम्पसह सिग्नेचर लाइट, नवीन ग्रिलवर क्रोम आणि अनेक डिझाईन्सचं बंपर देण्यात आलं आहे.
केबिनमध्ये का आहेत फीचर : ऑडी इंडियानं 5 रंगांमध्ये नवीन Q7 SUV लाँच केली आहे. सखीर गोल्ड, वैटोमो ब्लू, मिथॉस ब्लॅक, सामुराई ग्रा, आणि ग्लेशियर व्हाइट, असे हे पाच रंग आहेत. कारच्या केबिनमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत. ज्यात सेडर ब्राउन आणि सायगा बेज इंटिरियर थीम आहेत. उर्वरित केबिन पूर्वीप्रमाणेच आहे, परंतु त्याच्या इन्फोटेनमेंट सिस्टम आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. अद्ययावत ऑडी Q7 ला व्हर्च्युअल कॉकपिट मिळतोय, जो लेन चेंज वॉर्निंग सिस्टमसह येतो.
किती शक्तिशाली आहे इंजिन : Audi मध्ये अपडेटेड Q7 SUV सह 3.0-लाइट ट्विन-टर्बो पेट्रोल इंजिन आहे. हे शक्तिशाली इंजिन 340 bhp पॉवर आणि 500 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. यासोबत, 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि ऑडीची क्वाट्रो AWD प्रणाली मानक म्हणून प्रदान करण्यात आली आहे. ही SUV 5.6 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग वाढवते, तर तिचा टॉप स्पीड 250 किमी/ताशी आहे. त्याची किंमत त्याच्या प्रतिस्पर्धी BMW X5, Mercedes GLE आणि Volvo XC90 पेक्षा सुमारे 10 लाख रुपये कमी आहे. एकूणच, नवीन ऑडीमध्ये केवळ कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत.
हे वाचलंत का :