ETV Bharat / technology

K-4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, 3 हजार 500 किमीच्या लक्षावर अचूक मारा - BALLISTIC MISSILE K4

भारतानं पाणबुडीतून सोडलेल्या अणु-सक्षम क्षेपणास्त्राची चाचणी घेतलीय. INS अरिघाट या पाणबुडीवरून 3,500 किमीच्या बॅलिस्टिक K4 क्षेपणास्त्राची भारतीय नैदलानं यशस्वी चाचणी केलीय.

ballistic missile K4
बॅलिस्टिक K4 क्षेपणास्त्र (X media)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 28, 2024, 3:52 PM IST

हैदराबाद : भारतीय नौदलानं नुकत्याच समाविष्ट केलेल्या INS अरिघात या पाणबुडीवरून 3,500 किमीच्या बॅलिस्टिक K-4 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलीय. या चाचणीमुळं भारताची ताकद आणखी वाढणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नौदल आता भविष्यात आणखी अनेक क्षेपणास्त्र प्रणालींची चाचणी घेणार आहे.

3500 किमीचं लक्ष भेदण्याची क्षमता : नौदलानं बुधवारी K4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. अरिघाट या आण्विक पाणबुडीवरून ही चाचणी करण्यात आली. 2017 मध्ये अरिघाट लाँच करण्यात आली होती. त्याची अपग्रेड केलेली आवृत्ती लवकरच कार्यान्वित होणार आहे. अरिघाट ही आयएनएस अरिहंतची अपग्रेडेड आवृत्ती आहे. हे विशाखापट्टणम येथील भारतीय नौदलाच्या जहाज बांधणी केंद्रात (SBC) बांधली गेली आहे. अरिहंतच्या तुलनेत अरिघाट हे के-4 क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असेल ज्यात 3500 किमीचं लक्ष भेदण्याची क्षमता आहे. या पाणबुडीचं वजन 6 हजार टन आहे.

दोन आण्विक पाणबुड्या : भारतीय नौदलाकडं INS अरिहंत आणि अरिघात आहेत भारतीय नौदलाच्या शस्त्रागारात दोन आण्विक पाणबुड्या आहेत, ज्यात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता आहे. आरिघाटला ऑगस्टमध्ये विशाखापट्टणम येथील शिप बिल्डिंग सेंटरमध्ये समाविष्ट करण्यात आलं होतं. अशा प्रकारची ही तिसरी पाणबुडी आहे. ती पुढील वर्षी सामील होण्याची अपेक्षा आहे.

3 पाणबुड्या तयार : भारतानं आण्विक क्षेपणास्त्रांनी सुसज्ज 3 पाणबुड्या तयार केल्या आहेत. यापैकी एक अरिहंत कार्यान्वित झाली आहे, दुसरी अरिघात थोड्याच दिवसात नैदलात दाखल होईल. तिसऱ्या आण्विक क्षेपणास्त्र S3 ची चाचणी सुरू आहे. या पाणबुड्यांद्वारे शत्रू देशांवर आण्विक क्षेपणास्त्रे डागता येतात. 2009 मध्ये, प्रथमच, INS अरिहंत ला कारगिल विजय दिवसानिमित्त माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पत्नीनं प्रतिकात्मकरित्या लॉंच केलं होतं. यानंतर 2016 मध्ये नौदलाच्या ताफ्यात तिचा समावेश करण्यात आला होता. पुढील 5 वर्षांत भारतीय नौदलात आणखी दोन पाणबुड्या दाखल झाल्या आहेत.

1990 बांधकाम सुरू : 2009 मध्ये आण्विक क्षेपणास्त्र लाँच करण्यापूर्वी भारतानं पाणबुड्या जगापासून लपवून ठेवल्या होत्या. 1990 मध्ये, भारत सरकारनं ATV म्हणजेच Advanced Technology Vessel Program सुरू केला होता. त्याअंतर्गत या पाणबुड्यांचं बांधकाम सुरू झालं होतं.

हे वाचलंत का :

  1. भारताककडून आर्मेनियाला पिनाका शस्त्र प्रणालीचा पुरवठा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.