ETV Bharat / state

कोल्हापुरातही जीबीएसचा शिरकाव, दोन रुग्ण सीपीआरमध्ये दाखल; शहरात खळबळ - GBS SYNDROME IN KOLHAPUR

कोल्हापुरात जीबीएस सिंड्रोमचे दोन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं शहरात खळबळ उडाली आहे. दोन्ही रुग्णांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

GBS SYNDROME IN KOLHAPUR
प्रातिनिधक चित्र (संग्रहित छायाचित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2025, 3:46 PM IST

Updated : Jan 28, 2025, 4:05 PM IST

कोल्हापूर : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात जीबीएस सिंड्रोम रुग्णांचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असून कोल्हापुरातही जीबीएसचे दोन रुग्ण सापडल्यानं खळबळ उडाली आहे. दोन्ही रुग्णांवर कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचं राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

सर्वाधिक रुग्ण पुण्यात : जीबीएस सिंड्रोम या दुर्मीळ आजाराचं सर्वाधिक प्रमाण पुण्यात आहे. पाण्यावाटे आणि न शिजलेल्या अन्नावाटे हा आजार बळावतो. या रोगावर तत्काळ उपायोजना हाच उपाय आहे. कोल्हापुरात आढळून आलेल्या दोन रुग्णांमध्ये जीबीएस सिंड्रोमची लक्षणं आढळली आहेत. मात्र, हा आजार संसर्गजन्य नसल्यानं नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी केलं.

माध्यमांशी बोलताना डॉ. एस. एस. मोरे (ETV Bharat Reporter)

अशी आहेत जीबीएस सिंड्रोमची लक्षणं : प्राथमिक लक्षणांमध्ये हाता-पायाला मुंग्या येणे, वारंवार येणारा अशक्तपणा, बोलताना आणि गिळताना होणारा त्रास अशी या रोगाची लक्षणं आहेत. तर, न शिजवलेलं अन्न आणि हॉटेलमधील पदार्थ टाळावेत असं आवाहनही यावेळी राजर्षी छत्रपती शाहू वैद्यकीय महाविद्यालयाकडून करण्यात आलं आहे.

सीपीआर रुग्णालय सज्ज, 60 अतिदक्षता बेड उपलब्ध : कोल्हापूरसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कर्नाटकातील बेळगाव, विजापूर येथून मोठ्या प्रमाणात रुग्ण सीपीआरमध्ये रोज दाखल होत असतात. जीबीएस सिंड्रोमची लागण झालेले 60 वर्षीय वृद्ध हे बेळगाव जिल्ह्यातील असून सहा वर्षाच्या बाळावरही सीपीआरमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयाकडून सीपीआर रुग्णालयात 60 अतिदक्षता बेडची सुविधा करण्यात आली असून रुग्ण वाढल्यास रुग्णालय सज्ज असल्याचं यावेळी डॉक्टरांनी सांगितलं. तसंच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही सीपीआर प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना केल्याचं डॉ. मोरे यांनी यावेळी सांगितलं.

नागरिकांनी सतर्क राहावे : कोल्हापूर आणि राज्यातील जनतेला आवाहन करताना डॉ. मोरे यांनी पाणी उकळून प्यावं तसंच हॉटेलमधील पदार्थ टाळावेत, रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असं अन्न सेवन करावं तसंच काही लक्षणे जाणवल्यास जवळच्या डॉक्टरांशी संपर्क करावा असं आवाहन केलं.

हेही वाचा :

  1. 'जीबीएस' आजारानं रुग्णाचा मृत्यू होतो का? आरोग्यमंत्र्यांनी थेटच सांगितलं...
  2. गुइलेन बॅरे सिंड्रोमपासून वाचण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश; 'या' पदार्थापासून रहा दहा हात लांब
  3. जीबीएसचे पुण्यात १०० हून अधिक रुग्ण; कमला रुग्णालयात ४५ खाटांचा वॉर्ड सुरू

Last Updated : Jan 28, 2025, 4:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.