ETV Bharat / state

छोटा शकील अन् सिद्दिकी कुटुंबाचे संबंध? बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात अनिल परबांचा मोठा गौप्यस्फोट - BABA SIDDIQUI MURDER CASE

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुलगा झिशानेच दोन नेत्यांची नावे घेतल्याने त्याची चर्चा सुरू आहे. यावर ठाकरे गटाचे नेते अनिल परबांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडलीय.

Thackeray group leader Anil Parab
ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2025, 2:40 PM IST

मुंबई- राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाचा तपास सध्या वेगळाच वळणावर पोहोचलाय. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी विशेष मकोका न्यायालयात 4500 पानांचे आरोपपत्र दाखल केले असून, पोलिसांना दिलेल्या जबाबात बाबा सिद्दिकी यांचे चिरंजीव झिशान सिद्दिकी यांनी भाजपा नेते मोहित कंबोज आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या नावाचादेखील उल्लेख केलाय. एका बड्या नेत्याच्या हत्या प्रकरणात बाबा सिद्दिकी यांच्या मुलानेच दोन नेत्यांची नावे घेतल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे.

...म्हणून मी त्या सभेला गेलो होतो : या आरोपांवर वांद्रे येथे आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना आमदार अनिल परब म्हणाले की, "मी आरोपपत्र वाचलेले नाही. पण पोलिसांना या प्रकरणाचा तपास करताना जे आढळलं ते पोलिसांनी या आरोपपत्रात लिहिलं असेल. त्या दिवशी वांद्रे येथील संत ज्ञानेश्वर नगर येथे झालेल्या सर्वपक्षीय सभेला या मतदारसंघाचा आमदार म्हणून मलादेखील बोलवण्यात आलं होतं. म्हणून मी तिथे गेलो होतो. त्या सभेला सर्वच पक्षाचे लोक उपस्थित होते. तिथे झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना मदत व्हावी म्हणून मी त्या सभेला गेलो होतो," असंही अनिल परबांनी सांगितलंय.

तर त्यांनी पोलीस आणि सरकारकडे दाद मागावी : तसेच 24/10/2024 रोजी पोलिसांनी जो जबाब नोंदवलाय, त्या आधारेच पोलीस तपास करीत असतात. त्यात झिशान सिद्दिकी यांना पोलिसांच्या तपासाबाबत काही शंका असतील, तर त्यांनी सरकारला सांगावं, त्यांचंच सरकार आहे. बाबा सिद्दिकी यांना कोणकोणत्या गँगच्या धमक्या आल्यात हे मी बातम्यांमध्ये पाहिलंय. एकदा तर छोटा शकील गँगने धमकी दिल्याचीदेखील मी बातमी पाहिली होती. सध्या जो तपास सुरू आहे, सध्या जे आरोपपत्र दाखल केलंय, त्यावर सिद्दिकी समाधानी नसतील तर त्यांनी पोलीस आणि सरकारकडे दाद मागावी आणि सरकारने त्यावर खुलासा करावा," असं आमदार अनिल परब यांनी म्हटलंय.

इथल्या बिल्डरांना आम्ही सर्वच ओळखतो : पृथ्वी चव्हाण नामक बिल्डरला अनिल परब यांनी आणले आणि या बिल्डरने या भागातील लोकांची फसवणूक केली, असा आरोप देखील अनिल परब यांच्यावर करण्यात आला आहे. यावर बोलताना अनिल परब म्हणाले की, "तिथे जे काही झालं त्या सर्वाची रेकॉर्डिंग होत असते. ते रेकॉर्डिंग तपासावं. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण त्याचा तपास करीत असतो. त्याची मिनिटं रेकॉर्ड केली जातात. जर मी खरंच तसं काही केलं असेल तर ते झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या रेकॉर्डिंगमध्ये आढळून येईल. इथल्या बिल्डरांना आम्ही सर्वच ओळखतो. मुंबईत असा कुठलाही बिल्डर नाही, ज्याला आम्ही ओळखत नाही आणि बिल्डरांना त्या भागाचा विकास करण्यासाठी लोक आणतात. आम्हाला फक्त लोक बोलावतात आणि आम्ही तिथे जातो. यात गैर काय आहे?, असा सवालही अनिल परब यांनी उपस्थित केलाय.

आम्ही चौकशीला सहकार्य करण्यास तयार : "यात ज्या बिल्डरांची नावं आहेत, त्यामध्ये आदमी ग्रुपचादेखील समावेश आहे. वाधवा ग्रुपचादेखील समावेश आहे, पृथ्वी चव्हाण ग्रुपचादेखील समावेश आहे. असे अनेक मोठमोठे बिल्डर आहेत, ज्यांचा यात समावेश आहे. त्यांनादेखील पोलिसांनी चौकशीला बोलवावं. ज्ञानेश्वरनगर येथील झोपडपट्टी पुनर्विकासासाठी झालेल्या पहिल्या मीटिंगला मी होतो. स्वतः झिशान सिद्दिकी होते. मनसेचे काही पदाधिकारी होते. आम्ही सर्वच होतो. पोलिसांनी आमची कधीही चौकशी करावी. आम्ही चौकशीला सहकार्य करण्यास तयार आहोत. परंतु यात त्यांना आणखी काही अँगल आहेत, असं वाटत असेल तर तेदेखील तपासून पाहिले पाहिजेत," अशी प्रतिक्रिया आमदार अनिल परब यांनी दिलीय.

केवळ आरोप करून चालणार नाही : झिशान सिद्दिकी यांनी केलेल्या आरोपावर परब म्हणाले की, केवळ आरोप करून चालणार नाही. आरोप सिद्धदेखील केले पाहिजेत. त्यांचंच सरकार बसलेलं आहे. पोलिसांच्या माध्यमातून त्यांनी चौकशी करावी. बाबा सिद्दिकी यांचे कोणकोणत्या डेव्हलपर्स सोबत संबंध होते? त्यांचं कुणाकुणाशी बोलणं झालंय? त्यांचे काय संबंध होते? त्यांचं कशासाठी बोलणं झालं? हे देखील तपासायला हवं. यात कोणतं राजकारण आहे का? त्याच्यात एसआरएचा अँगल जोडला जात आहे का? ते मला माहिती नाही. कदाचित सत्य परिस्थिती बाहेर येऊ नये म्हणून देखील हा झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचा अँगल लावला जात असेल. मला माहिती नाही, असंही परबांनी स्पष्ट केलंय.

आता ही धमकी कशासाठी दिली? : "काही दिवसांपूर्वी मी टीव्हीवर बातमी पाहिली होती. छोट्या शकीलनं बाबा सिद्दिकींना धमकी दिली. आता ही धमकी कशासाठी दिली? हे देखील मला माहिती नाही. छोटा शकील सोबत यांचे व्यवहार काय होते? आम्हाला माहिती नाही. अशा काही गोष्टी लपवण्यासाठी हा अँगल वापरला जात आहे का? याचा देखील पोलिसांनी तपास केला पाहिजे. माझं तर पोलिसांना आवाहन आहे, पोलिसांनी हे सर्व तपासावं. झिशान आणि बाबा सिद्दिकी ही दोघेही आमदार असल्याने मी त्यांना ओळखतो. पण त्यांचे व्यवहार काय आहेत? ते मला माहिती नाही. पोलिसांनी या सर्वांचा तपास करायला हवा आणि सत्य बाहेर आणायला हवं," अशी मागणी देखील आमदार अनिल परब यांनी केलीय.

हेही वाचाः

राजूल पटेलांसह अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश, आता अनिल परब म्हणतात...

बाबा सिद्दीकींच्या डायरीवरून प्रकरणाला नवं वळण, संशयाची सुई येताच मोहित कंबोज यांचा खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.