ETV Bharat / technology

Huawei चा स्वयं-विकसित ऑपरेटिंग सिस्टमसह पहिला Mate 70 Pro स्मार्टफोन लॉंच - HUAWEI LAUNCHES MATE 70 PRO

Huawei नं नवीन स्वयं-विकसित ऑपरेटिंग सिस्टमसह आपला पहिला Mate 70 Pro स्मार्टफोन लॉंच केलाय. या फोनला Kunlun Glass चं संरक्षण दिलं गेलं आहे.

Mate 70 Pro
Mate 70 Pro स्मार्टफोन (Huawei)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 28, 2024, 1:10 PM IST

हैदराबाद : Huawei नं आपला नवीन Mate 70 Pro स्मार्टफोन लॉंच केला आहे. हा फोन 50MP सुपर-फोकस कॅमेरा, 40MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 48MP सुपर-फोकस मॅक्रो टेलिफोटो कॅमेरासह येतो.

Huawei Mate 70 Pro लॉंच : Huawei नं आपला नवीन Mate 70 Pro स्मार्टफोन बाजारात आणला आहे. हा फोन शक्तिशाली वैशिष्ट्ये आणि प्रगत कॅमेरा सेटअपसह येते. HUAWEI Mate 70 सीरीजमध्ये कंपनी आपल्या नवीन स्मार्टफोनचा विस्तार करत आहे. आज आपण नवीन Mate 70 Pro मधील फीचर आणि किंमतीबद्दल जाणून घेऊया...

Huawei Mate 70 Pro चे फीचर : Huawei Mate 70 Pro मध्ये 6.9-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले आहे, जो 120Hz व्हेरिएबल रिफ्रेश रेटसह येतो. तसंच या फोनला Kunlun Glass चं संरक्षण दिलं गेलं आहे. फोनला पॉवरिंग 5,500mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 100W सुपरफास्ट चार्जिंग आणि 80W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

सुपर-फोकस कॅमेरा : कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, हा फोन 50MP सुपर-फोकस कॅमेरा, 40MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 48MP सुपर-फोकस मॅक्रो टेलीफोटो कॅमेऱ्यासह येतो. हा फोन 4x ऑप्टिकल झूम आणि 100x डिजिटल झूमला सपोर्ट करतो.

काय आहे किंमत : Huawei Mate 70 Pro ची किंमत 6 हजाज 499 युआन (भारतीय चलनात सुमारे 75 हजार 670 रुपये) पासून 7,999 युआन (93 हजार 135) पर्यंत आहे. हा फोन नुकताच चीनमध्ये लॉंच झाला आहे. लवकरच तो जागतिक बाजारपेठेत सादर केला जाईल, अशी अपेक्षा आहे.

हे वाचलंत का :

  1. Redmi चा दमदार स्मार्टफोन Redmi K80 ची एंन्ट्री, अप्रतिम कॅमेऱ्यासह शक्तीशाली प्रोसेसर
  2. Redmi K80 Pro स्मार्टफोन Snapdragon 8 Elite प्रोसेसरसह लॉंच, स्टायलिश लुक आणि उत्कृष्ट वैशिष्ट्ये
  3. Redmi Watch 5 आणि Buds 6 Pro सादर, . Buds 6 Pro चा 36 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.