ETV Bharat / state

बहिणीला २०० फूट डोंगरावरून ढकलून देत भावानं केली हत्या; हत्येचं धक्कादायक कारण आलं समोर - HONOR KILLING

ऑनर किलिंगनं छत्रपती संभाजीनगर पुन्हा एकदा हादरलंय. एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीची 200 फूट डोंगरावरून खाली ढकलून हत्या करण्यात आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Honor killing news, brother killed sister thrown from 200 feet mountain
छत्रपती संभाजीनगर ऑनर किलिंग (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2025, 7:03 AM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : जिल्ह्यातील वाळूज भागात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना घडलीय. जालना जिल्ह्यातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्याच चुलत भावानं डोंगरावरून ढकलून दिलं. सुरुवातीला हा आत्महत्येचा प्रकार वाटत असताना काही वेळातच ही हत्या असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. ऋषिकेश शेरकर असं आरोपी भावाचं नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात अटक केली आहे. या प्रकरणात कुटुंबातील इतर सदस्य समाविष्ट आहेत का? याचा सध्या तपास सुरू आहे.

मुलीचे होते प्रेम प्रकरण : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहागड येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या परिचित युवकाच्या प्रेमात पडली. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी दोघांची समजूत काढली. इतकंच नाही तर संबंधित युवकाच्या विरोधात पोलिसात तक्रार देऊन त्याच्यावर मुलीशी संबंध तोडण्यासाठी दबाव आणला. तर मुलाच्या कुटुंबीयांनादेखील तशी ताकीद देण्यात आली. तसंच मुलीलादेखील सज्जड दम देण्यात आला. मात्र, त्यानंतर मुलगी घर सोडून गेली. कुटुंबीयांनी सर्वत्र तपास घेतला. मात्र, ती आढळून आली नाही. घरच्यांकडून जीवाला धोका असल्याची तक्रार मुलीनं शहागड पोलिसांना दिली होती. त्यानंतर तब्बल दहा ते पंधरा दिवसांनी ती घरी परतली. त्यावेळी तिची समजूत काढण्यासाठी तिला छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूज येथे काकांकडं पाठवण्यात आलं.

चुलत भावानं डोंगरावरून ढकललं : अल्पवयीन मुलगी गेल्या 8 दिवसांपासून वाळूज येथील काका तानाजी यांच्याकडं राहण्यास आली होती. काका तानाजी आणि भाऊ ऋषिकेश यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यात सोमवारी दुपारी ऋषिकेश बहिणीला गोड बोलून खावडा डोंगरावर घेऊन आला. तिथं तिच्याशी बोलता-बोलता त्यानं तिला 200 फूट दोंगरावरून खाली ढकलून दिलं. सुरुवातीला मुलीनं आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी या घटनेसंदर्भात माहिती दिली असता हा खून असल्याचं निष्पन्न झालं. घटना घडली तेव्हा तिथं क्रिकेट खेळत असलेल्या युवकांनी घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यावरुन आरोपी भाऊ ऋषिकेश याला एम.आय.डी.सी वाळूज पोलिसांनी ताब्यात घेतलं. आरोपी ऋषिकेश याआधी एका प्रकरणात अटकेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे आणि इतर पोलीस कर्मचारी करत आहेत.

हेही वाचा -

  1. मुलानं मागासवर्गीय मुलीवर केलं प्रेम; वडिलांनी पोटच्या मुलाचा काढला 'काटा'
  2. पोटच्या पोरीची आई-वडिलांनी केली हत्या, 'हे' धक्कादायक कारण आलं समोर
  3. दुसऱ्या धर्मातील तरुणाबरोबर बहिणीचं प्रेमप्रकरण, संतापलेल्या भावानं अल्पवयीन बहिणीची गोळ्या झाडून केली हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.