मुंबई : विधानसभेच्या अभूतपूर्व निकालात भाजपा राज्यात सर्वात जास्त मते मिळवून राज्यातील पहिल्या क्रमांकाचा राजकीय पक्ष बनलाय. भाजपाला एकूण मतदानाच्या 26.77 टक्के मते मिळाली आणि त्यांचे 132 उमेदवार निवडून आलेत. भाजपाला 1 कोटी 72 लाख 93 हजार 650 मते मिळाली. भाजपा खालोखाल काँग्रेसला द्वितीय क्रमांकाची 12.42 टक्के म्हणजे 80 लाख 20 हजार 921 मते मिळाली, मात्र काँग्रेसचे अवघे 16 उमेदवार विजयी झालेत.
केवळ 10 उमेदवारांना विजय मिळवता आलाय : तृतीय क्रमांकाची 12.38 टक्के मते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मिळाली. त्यांना 79 लाख 96 हजार 930 मते मिळाली. त्यांचे 57 उमेदवार विजयी झाले. 11.28 टक्के मते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालीय, त्यांना 72 लाख 87 हजार 797 मते मिळाली. मात्र त्यांच्या केवळ 10 उमेदवारांना विजय मिळवता आलाय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या 9.96 टक्के मते मिळालीय. 64 लाख 33 हजार 13 मते मिळवून त्यांचे 20 उमेदवार विजयी झालेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 9.01 टक्के मते मिळाली. त्यांना 58 लाख 16 हजार 566 मते मिळाली, मात्र त्यांचे 41 उमेदवार विजयी झालेत.
नोटाला 0.72 टक्के म्हणजेच 4 लाख 61 हजार 886 मते : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अवघी 1.55 टक्के म्हणजे 10 लाख 02 हजार 557 मते मिळालीत, मात्र त्यांचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. नोटाला 0.72 टक्के म्हणजेच 4 लाख 61 हजार 886 मते मिळालीत. 'माकप'ला ०.३४ टक्के म्हणजे २ लाख २२ हजार २७७ मतं मिळाली व त्यांचा एक उमेदवार विजयी झाला. तर, 'बसपा'ला ०.४८ टक्के म्हणजे ३ लाख ११ हजार ७८१ मतं मिळाली, मात्र त्यांचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही.
राजकीय पक्ष | मतांची टक्केवारी | मिळालेली मते | विजयी उमेदवार |
भाजपा | 26.77 | 1,72,93,650 | 132 |
काँग्रेस | 12.42 | 80,20,921 | 16 |
शिवसेना | 12.38 | 79,96,930 | 57 |
राष्ट्रवादी श.प. | 11.28 | 72,87,797 | 10 |
शिवसेना उ.बा.ठा. | 09.96 | 64,33,013 | 20 |
राष्ट्रवादी काँग्रेस | 09.01 | 58,16,566 | 41 |
समाजवादी पार्टी | 0.38 | 2,47,350 | 02 |
एमआयएम | 0.85 | 5,50,902 | 01 |
मनसे | 01.55 | 10,02,557 | 0 |
नोटा | 0.72 | 4,61,886 | - |
इतर | 13.82 | 89,27,705 | 8 |
हेही वाचा :