ETV Bharat / entertainment

'पुष्पा 2: द रुल'चं शूटिंग आणि एडिटिंगचं काम संपलं, अल्लू अर्जुनचा चित्रपट रिलीजसाठी सज्ज - PUSHPA 2 THE RULE WORK COMPLETED

'पुष्पा २' चे शूटिंग आणि एडिटिंगचं काम संपलं आहे. आता हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली आहे.

Allu Arjun
अल्लू अर्जुन ((IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 28, 2024, 7:20 PM IST

मुंबई - अल्लू अर्जुन, फहद फसिल आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. धमाकेदार ट्रेलर लॉन्च आणि गाण्यांच्या रिलीजनंतर या चित्रपटाची चाहत्यांच्या मनातील चित्रपटाविषयीची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. रिलीजची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसे निर्मात्यांनी एडिट टेबलवरील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दिग्दर्शक सुकुमार चित्रपटाची अंतिम एडिटींग प्रक्रिया पूर्ण करताना दिसत आहेत. 'पुष्पा 2' हा 2024 सालचा मोस्ट अवेटेड चित्रपट आहे. आता चित्रपट शूटिंग आणि एडिटिंगसह पूर्ण झाला आहे आणि निर्मात्यांनी एक मोठा अपडेट दिले आहे.

निर्मात्यांनी फोटो शेअर केले आणि लिहिले, ''सर्व काही तयार आहे आणि लॉक आहे, मॅवेरिक दिग्दर्शकाची दृष्टी तुम्हाला मंत्रमुग्ध करेल, भारतातील सर्वात मोठा चित्रपट तुम्हाला एक अद्भुत अनुभव देणार आहे. हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होईल''. नुकतेच या चित्रपटाचे 'किसिक' हे आयटम साँग रिलीज झाले असून, त्याला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळालेला आहे. यावेळी, पुष्पा 2 च्या आयटम साँगमध्ये, साउथ सिनेमाची डान्सिंग क्वीन श्रीलीला हिनं घेतली आहे.

अल्लू अर्जुन 'पुष्पा २: द रुल'मध्ये प्रसिद्ध पात्र पुष्पा राज म्हणून परतला आहे. रश्मिका मंदान्ना पुन्हा श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसणार आहे आणि फहद फसिल हा पुष्पाचा शत्रू पोलीस अधिकारी भंवर सिंग शेखावतच्या भूमिकेत दिसणार आहे.

सुकुमार दिग्दर्शित, 'पुष्पा 2: द रुल'ची निर्मिती मैत्री मुव्हिज मेकर्स आणि सुकुमार रायटिंग्ज यांनी केली आहे. चित्रपटाचे संगीत टी-सीरीजवर प्रदर्शित होणार आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट 5 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.