हैदराबादIran lifts ban on iPhone : इराणनं नवीन आयफोन मॉडेल्सच्या आयातीवरील बंदी उठवलीय. 2023 मध्ये लादण्यात आलेल्या बंदीमुळं नवीन आयफोन मॉडेल्सच्या आयातीवर बंदी घालण्यात आली होती. ज्यामुळं फोन खरेदी करू इच्छिणाऱ्या अनेक इराणी लोकांवर याचा परिणाम झाला होता. आयफोनवरील बंदी उठवण्याची घोषणा इराणचे दूरसंचार मंत्री सतार हाशेमी यांनी केली आहे. यामुळे देशात iPhone 14, iPhone 15 आणि iPhone 16 मॉडेल्सची आयात आणि विक्री करता येईल. या निर्णयामुळं इराणमधील नागरिकांना आयफोन खरेदी करता येणार आहे.
इराणच्या धोरणात बदल :दूरसंचार मंत्री सतार हाशेमी यांनी Xवर पोस्ट करत इराणच्या धोरणात बदल करण्याची घोषणा केली. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी देखील हाशेमी यांच्या निर्णयाला पाठिंबा दिलाय. मात्र, आयात प्रक्रियेबद्दल अद्याप तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. परंतु त्यांनी केलेल्या घोषणेमुळं इराणमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 'आयफोन बंदीची समस्या फेडरल सरकारच्या प्रशासनानं राष्ट्रपतींच्या पाठिंब्यानं सोडवण्यात आली आहे. मला विश्वास आहे एकमतानं इतर समस्याही सोडवल्या जावू शकतात', असं हाशेमी म्हणाले.