जेद्दाह DSP in Gujrat Titans : आयपीएल 2025 साठी मेगा लिलाव सुरु आहे. सुरुवातीला 12 मार्की खेळाडूंवर बोली लावण्यात आली. यावेळी मार्की खेळाडूंच्या यादीत सात भारतीय आणि पाच परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू क्रिकेट जगतात खूप लोकप्रिय आहेत, त्यांनी गेल्या काही वर्षांत T20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. यातील अनेक खेळाडू मालामाल झाले.
Need some speed #GT fans 🤔
— IndianPremierLeague (@IPL) November 24, 2024
Mohammed Siraj on his way! 👌👌#TATAIPLAuction | #TATAIPL | @mdsirajofficial | @gujarat_titans pic.twitter.com/ptxZ0kugtv
गुजरातनं घेतलं संघात : आयपीएल 2025 च्या मेगा लिलावामध्ये, गुजरात टायटन्सनं आरसीबीकडून खेळणाऱ्या मोहम्मद सिराजचा त्यांच्या संघात समावेश केला आहे. त्याला विकत घेण्यासाठी अनेक संघांमध्ये बोलीचं युद्ध झालं. शेवटी विजय गुजरात संघाच्या वाट्याला गेला आणि त्यांनी सिराजला 12.25 कोटी रुपयांना विकत घेतलं. सिराज गुजरात संघात सामील झाल्यानं त्यांच्या गोलंदाजीला फायदा होईल. सिराजला अनुभव आहे आणि तो पॉवरप्लेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याचा मार्ग बदलण्याची क्षमताही सिराजकडे आहे.
आरसीबी संघाचा होता भाग : मोहम्मद सिराज 2018 पासून आरसीबी संघाकडून खेळत होता. गेल्या काही वर्षांत त्यानं आरसीबी संघासाठी चांगली कामगिरीही केली होती. आरसीबी संघापूर्वी तो सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता. मात्र यावेळी आरसीबी संघानं त्याला कायम ठेवलं नाही.
𝐃umdaar 𝐒iraj, 𝐏adhaaro 🫡#AavaDe | #TATAIPLAuction | #TATAIPL | @mdsirajofficial pic.twitter.com/0qxzoKb9E6
— Gujarat Titans (@gujarat_titans) November 24, 2024
तेलंगणा पोलिसमध्ये आहे DSP : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची हा तेलंगणात पोलीस महासंचालक (DGP) यांच्या देखरेखीखाली पोलीस उपअधीक्षक (DSP) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. वेस्ट इंडिजमधील बार्बाडोस इथं झालेल्या T20 विश्वचषकात भारताच्या विजयात हातभार लावल्यानंतर सिराज हैदराबादेत परतल्यावर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी त्याला बक्षीसासह एक भूखंड आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली होती. यानंतर रेवंत रेड्डी यांनी आपलं वचन पूर्ण करत मोहम्मद सिराजची नियुक्ती केली.
Need some speed #GT fans 🤔
— IndianPremierLeague (@IPL) November 24, 2024
Mohammed Siraj on his way! 👌👌#TATAIPLAuction | #TATAIPL | @mdsirajofficial | @gujarat_titans pic.twitter.com/ptxZ0kugtv
आयपीएलमध्ये मध्ये 90 पेक्षा जास्त विकेट : मोहम्मद सिराजनं आतापर्यंत आयपीएलच्या 93 सामन्यांत 93 बळी घेतले आहेत. 21 धावांत चार विकेट ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.
पंत ठरला सर्वात महागडा, अय्यरही झाला मालामाल : या लिलावात सर्वांच्या नजरा ऋषभ पंतवर खिळल्या होत्या. पंतला लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघानं सोडलं होतं. त्याच्यावर मोठी बोली लावली जाणार हे निश्चित होतं आणि नेमकं तेच झालं. लखनऊ सुपर जायंट्स संघानं पंतला तब्बल 27 कोटी रुपयांत खरेदी केलं. 2016 नंतर पंत पहिल्यांदाच दिल्लीशिवाय अन्य संघाकडून खेळताना दिसणार आहे. पंत अलीकडं उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गेल्या वर्षी कार अपघातानंतर परतल्यानंतर त्यानं खूप धावा केल्या. लखनऊचा संघ त्याला कर्णधार बनवू शकतो. तसंच श्रेयस अय्यरलाही तब्बल 26.75 करोड रुपयांमध्ये पंजाब किंग्जनं आपल्याकडे घेतलं आहे.
हेही वाचा :