हैदराबाद : Vivo आपली Vivo X200 सीरीज भारतात सादर करण्यासाठी सज्ज झालाय. Vivo X200 मालिकेत प्रगत कॅमेरा, शक्तिशाली बॅटरीसह Vivo X200 आणि Vivo X200 Pro मॉडेल्सचा समावेश असरण्याची शक्यता आहे.
What you thought was far... just got closer.
— vivo India (@Vivo_India) November 22, 2024
See the world not as it is, but as it could be.
Coming soon.#vivoX200Series pic.twitter.com/4BDe6qbWml
Vivo X200 सीरीज भारतात लॉंच होणार : Vivo आपल्या Vivo X200 मालिकेतील नवीनतम स्मार्टफोन भारतात लवकरच लॉंच करण्याच्या तयारीत आहे. मलेशियामध्ये जागतिक हा फोन लॉंच केल्यानंतर, X200 मालिका लवकरच भारतीय बाजारात लॉंच होईल. Vivo X200 मालिकेत Vivo X200 आणि Vivo X200 Pro समाविष्ट होण्याची अपेक्षा आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 9400 प्रोसेसर असू शकतो. Vivo X200 मध्ये 5,800mAh बॅटरी असण्याची अपेक्षा आहे, तर Vivo X200 मध्ये 6.67-इंचाचा डिस्प्ले असू शकतो. X200 Pro मध्ये 6.78-इंचाचा डिस्प्ले असण्याची शक्यता आहे.
कॅमेरा : दोन्ही स्मार्टफोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे. दोन्ही स्मार्टफोन्सचा मागील कॅमेरा सेटअप ट्रिपल कॅमेरासह येण्याची शक्यता आहे. Vivo X200 मध्ये मागे ट्रिपल 50MP कॅमेरा सेटअप असू शकतो.
Vivo तीन स्मार्टफोन लॉंच होणार : कंपनीनं Vivo X200 सीरीजचे तीन व्हेरियंट आपल्या होम मार्केटमध्ये लॉंच केले आहेत. मात्र, मलेशियाने सादर केलेल्या टीझरमध्ये फक्त दोन प्रकार समोर आले आहेत. यामध्ये Vivo X200 आणि Vivo X200 Pro ची झलक पहायाला मिळाली होती. यामुळे कंपनी या मालिकेतील तिन्ही मॉडेल्स भारतीय स्मार्टफोन बाजारात लॉंच करण्याची शक्यता आहे. Vivo X200 मालिका काही दिवसांपूर्वी चीनमध्ये लॉंच करण्यात आली होती. कंपनी या मालिकेतील तीन मॉडेल्स लॉंच करण्याचा विचार करत आहे. ही मालिका डिसेंबरच्या अखेरीस भारतात लॉंच होण्याची शक्यता आहे. यात मोठी बॅटरी आणि पॉवरफुल प्रोसेसर अशी वैशिष्ट्ये असतील.
रंग : Vivo X200 आणि X200 Pro टायटॅनियम, सॅफायर ब्लू, नाईट ब्लॅक आणि व्हाइट मूनलाइट रंगांमध्ये येतात. त्याच वेळी, नवीन मिनी व्हेरिएंट टायटॅनियम ब्लू, मायक्रो पावडर (गुलाबी,) आणि ॲनस्ट्रेटफॉरवर्ड (पांढरा) रंगांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
हे वाचलंत का :