हैदराबाद SwaRail App :भारतीय रेल्वेनं त्यांचं नवीन अॅप लॉंच केलंय. या स्वारेल ॲपची चर्चा गेल्या वर्षापासून सुरू होती. स्वारेल ॲप गुगल प्ले स्टोअर आणि आयओएस वर उपलब्ध असेल. हे ॲप रेल्वेच्या विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी एक-स्टॉप डेस्टिनेशन असेल. वापरकर्ते ॲपच्या मदतीनं आरक्षण करू शकतील आणि जनरल तिकिटे आणि प्लॅटफॉर्म तिकिटे देखील त्याद्वारे बुक करू शकतील. ट्रेन किती उशिरा धावत आहे किंवा ती वेळेवर पोहोचेल की नाही?, हे देखील तुम्हाला कळेल. केटरिंग सर्व्हिस म्हणजे खाण्यापिण्याची व्यवस्था असेल आणि रेल्वे मदतीचीही सेवाही या ॲपच्या माध्यामातून तुम्ही घेऊ शकता.
स्वारेल अॅप
रेल्वेचं हे नवीन अॅप सध्या बीटा व्हर्जनमध्ये आहे. याचा अर्थ, सध्यासाठी, त्याचा प्रवेश फक्त डेव्हलपर्स आणि निवडक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. सध्या हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर चाचणीसाठी उपलब्ध आहे. रेल्वे बोर्डाच्या एका अधिकाऱ्यानं सांगितले की, "फक्त 1000 वापरकर्ते ते डाउनलोड करू शकतात. आम्ही प्रतिसाद आणि अभिप्रायाचं मूल्यांकन करू. त्यानंतर, पुढील सूचनेसाठी डाउनलोडसाठी उपलब्ध करून दिलं जाईल." हे अॅप सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स (CRIS) ने विकसित केलं आहे. स्वारेल हे रेल्वेच्या सर्व सेवांसाठी एक प्रमुख अॅप असेल. याचा अर्थ असा की आयआरसीटीसी रेल कनेक्ट, आयआरसीटीसी ई-केटरिंग फूड ऑन ट्रॅक, रेल मदत, अनरिझर्व्ड तिकीट सिस्टम (यूटीएस) आणि नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टम सारख्या वेगवेगळ्या अॅप्स आणि पोर्टलची आता गरज नसेल.