महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

दुचाकीचा विमा काढताना 'ही' घ्या काळजी : ...अन्यथा होणार मोठं नुकसान - How to Choose Bike Insurance

How to Choose Bike Insurance : आजकाल दुचाकीचा विमा घेणं खूप सोपं झालं आहे. तुम्ही ऑनलाइन विमा कंपन्याच्या साइटला भेट देऊन काही मिनिटांत विमा खरेदी करू शकता. मात्र, विमा खरेदी करतानाही काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

How to Choose Bike Insurance
प्रातिनिधिक छायाचित्र (Etv Bharat MH Desk)

By ETV Bharat Tech Team

Published : Aug 29, 2024, 1:00 PM IST

हैदराबादHow to Choose Bike Insurance :सहसा नागरिक एजंट तसंच ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे दुचाकीचा विमा काढताना दिसतात. सध्या कोणत्याही वाहनाचा विमा काढण्यासाठी तुमच्याकडं विविध पर्याय उपलब्ध आहेत. परंतु विमा काढताना काळजी घेणं आवश्यक आहे. अन्याथा तुम्हाला मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. अनेक वेळा दुचाकीचा विमा घेणं, हे ग्राहकांच्या आवडीनिवडीवर अवलंबून असतं. त्यामुळं तुम्ही दुकाची विमा घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

दुचाकी विमा संरक्षण : विम्याचे प्राथमिक उद्दिष्ट दुर्दैवी घटनांच्या बाबतीत आर्थिक नुकसान कमी करणं आहे. प्रथम, तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कव्हरेजची आवश्यकता आहे, हे लक्षात घेऊनच विमा काढयला हवा. सर्वसमावेशक प्रकारची पॉलिसी तिच्या कव्हरेजमुळे दुचाकीसाठी सर्वोत्तम विमा पॉलिसी मानली जाते.

दुचाकी विमा किंमत : तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कव्हरेजची आवश्यकता आहे, हे समजल्यानंतर, तुम्ही कमी किमतीत कव्हरेज देणारे विमा प्रदाते शोधू शकता. वेगवेगळे विमा प्रदाते वेगवेगळ्या किमतींवर पॉलिसी देतात. टू-व्हीलरचं थर्ड-पार्टी विमा दर भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) द्वारे निश्चित केले जातात. त्यामुळं सर्वसमावेशक विमा पॉलिसींसाठी आकारला जाणारा प्रीमियम बदलतो. कोणती विमा कंपनी कोणत्या प्रकारचे कव्हरेज ऑफर तुम्हाला देणार आहे, यावर तुम्ही आगोदरच अभ्यास करायला हवा. तुम्हाला सर्वात कमी किमतीची पॉलिसी देणाऱ्या वेबसाइट्सशी व्यवहार करताना कव्हरेज पुन्हा तपासणं महत्त्वाचं आहे.

दुचाकी विमा कंपनी : प्रमुख विमा कंपन्या ऑनलाइन आहेत. तुम्ही फक्त त्यांच्या वेबसाइटला भेट देऊन दुचाकी विमा पॉलिसी खरेदी करू शकता. ई-कॉमर्स स्टोअरला भेट देऊन तेथून विमा खरेदी करणं सोपं आहे. निवडलेल्या पॉलिसीमध्ये असेल्या अटी जाणून घेतल्यानंतरच तुम्ही विमा खरेदी करावा. सर्वोत्कृष्ट दुचाकी विमा प्रदान करणारे विमाकर्ते विक्रीनंतरच्या सेवेकडे खूप लक्ष देतात.त्यामुळं विमाधारकाला मोठ्या नुकसानीपासून संरक्षण मिळतं.

दुचाकी विमा नूतनीकरण :विमा खरेदी केल्यानंतर, तुमची विमा पॉलिसी काही मिनिटांत तुमच्या नोंदणीकृत ईमेल इनबॉक्समध्ये पाठवले जाते. विमा कव्हरेज पॉलिसीचं वेळोवेळी नूतनीकरण करणं गरजेचं आहे.

हे वाचलंत का :

  1. ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, नवीन वाहन खरेदीवर मिळणार 25 हजारांची सुट - discounts on passenger vehicles
  2. बजाज 100cc मध्येही CNG मोटरसायकल लाँच करणार - Bajaj 100cc CNG Motorcycle
  3. ऑटोपायलट मोडमुळं ड्रायव्हरचा वर्कलोड कमी : टेस्ला मॉडेल 3 काय आहे ऑटोपायलट फिचर - Tesla Full Self Driving mode

ABOUT THE AUTHOR

...view details