हैदराबादRation Card EKYC Last Date :आजही भारतात लाखो लोक आहेत, ज्यांना दोन वेळचं जेवण मिळत नाही. यासाठी ते काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, कोविड महामारीच्या काळात लोकांना अन्नासाठी झगडावं लागलं होतं. त्यानंतर केंद्र सरकारसह राज्य सरकारानं देशभरातील 80 कोटींहून अधिक लोकांना मोफत रेशन देण्याची योजना आणली. सरकारच्या सूचनेनुसार शिधापत्रिकेद्वारे रेशन मिळण्यासाठी कार्डधारकांना ईकेवायसी करावं लागणार आहे. या सूचना अन्न पुरवठा विभागानं सर्व शिधापत्रिकाधारकांना दिल्या आहेत. जर शिधापत्रिकाधारकांचं ईकेवायसी झालं नाही, तर त्यांना रेशन मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळं शिधापत्रिकाधारकांना E-KYC कसी करावी लागणार आहे. तसंच E-KYC करण्याची शेवटची तारीख काय आहे, याबाबत माहिती घेणार आहोत.
E-KYC शेवटची तारीख :अन्न पुरवाठा विभागानं रेशनकार्डसाठी केवायसी करण्याची शेवटची तारीख यापूर्वी 30 जून 2024 निश्चित केली होती. त्यानंतर अन्न पुवठा विभागानं 30 सप्टेंबर 2024 पर्यंत केवायसी करण्याची तारीख वाढवली आहे. त्यामुळं आता तुम्ही तुमच्या रेशन कार्डचं केवायसी 30सप्टेंबरपूर्वी करू शकता.
E-KYC करण्याची प्रक्रिया काय :तुमच्या रेशन कार्डसाठी E-KYC करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. यासाठी, तुम्ही त्याच रेशन दुकानात किंवा राज्यातील इतर कोणत्याही रेशन दुकानात जाऊन E-KYC करू शकता. मात्र, केवायसी करताना ज्यांची नावं रेशनकार्डवर आहे, त्या सर्वांना जावं लागेल. त्यानंतरच त्यांच नाव पुन्हा अपडेट होईल. अन्यथा तुमचा राशनसुद्धा बंद होण्याची शक्यता आहे.