ETV Bharat / technology

पुढील आठवड्यात लाँच होणार Apple iPhone SE 4, जाणून घ्या अपेक्षित किंमत, वैशिष्ट्ये, डिझाईन - IPHONE SE 4 LAUNCHING NEXT WEEK

ॲपल आपला नवीन iPhone SE 4 लाँच करण्याच्या तयारीत आहे. अहवालानुसार तो पुढील आठवड्यात लॉंच होऊ शकतो.

iPhone SE 4
iPhone SE 4 (Shea X Account)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Feb 7, 2025, 11:19 AM IST

हैदराबाद iPhone SE 4 launched: स्वस्त आयफोनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण ॲपल पुढील आठवड्यात या वर्षाचा पहिला आयफोन लॉंच करण्याची शक्यता आहे. ॲपल पुढील आठवड्यात iPhone SE 4 लाँच करण्याची योजना आखत आहे. हा फोन 2022 मध्ये लाँच झालेल्या iPhone SE 3 ची आवृती असेल. नवीन आयफोनच्या डिझाइनमध्ये बरेच बदल होण्याची शक्यता आहे.

बजेट आयफोन लवकर लाँच

ॲपल iPhone SE 4 देखील पुढील महिन्यात लाँच होईल अशी अपेक्षा होती, परंतु आता अ‍ॅपल तो पुढच्या आठवड्यातच लाँच करणार आहे. कंपनी त्यांच्या वेबसाइटवर एका प्रेस रिलीजद्वारे या फोनच्या लाँचची घोषणा करू शकते. कंपनी 11 फेब्रुवारी रोजी पॉवरबीट्स प्रो 2 इयरबड्स लाँच करणार आहे. त्याच दिवशी iPhone SE 4 लाँच होऊ शकतो.

iPhone SE 4 चे फीचर्स (अपेक्षित)

iPhone SE 4च्या डिझाइनमध्ये अनेक बदल केले जातील. आयफोन एसई 3 मध्ये टच आयडी आणि 4.7-इंच डिस्प्ले होता, तर नवीन आयफोनमध्ये आधुनिक डिझाइन असेल. त्यात फेस आयडी आणि यूएसबी-सी पोर्ट असेल हे जवळजवळ निश्चित झालं आहे. त्याचा लूक आयफोन 14 सारखा असू शकतो आणि तो 6.06 ओएलईडी डिस्प्लेनं सुसज्ज असेल. Apple यात A18 चिपसेट देऊ शकते, जो 8GB रॅमसह जोडला जाईल. मानक स्टोरेज 128 जीबी असण्याची अपेक्षा आहे.

किती असू शकते किंमत?

यावेळी ग्राहकांना iPhone SE 4 साठी जास्त किंमत मोजावी लागू शकते. iPhone SE 3 2022 मध्ये भारतात सुमारे 43,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. यावेळी iPhone SE 4 ची किंमत 49,900 रुपयांपर्यंत वाढू शकते. तथापि, कंपनीकडून अधिकृतपणे याची पुष्टी झालेली नाही.

हे वाचलंत का :

  1. आयफोन १५ बनला नंबर १, २०२४ मध्ये आयफोन १५ची सर्वाधिक विक्री, जाणून घ्या टॉप 10 सेल होणाऱ्या फोनची यादी
  2. आयफोनवर आलं पहिलं पॉर्न अ‍ॅप, अ‍ॅपलनं केली चिंता व्यक्त
  3. iQOO Neo 10R रॅगिंग ब्लू रंगात ११ मार्चला होणार लाँच, अपेक्षित किंमत, डिझाइन, वैशिष्ट्ये जाणून घ्या...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.