महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

मायक्रोसॉफ्ट आणि ओपनएआयनं डीपसीकवर गंभीर आरोप, एपीआयचा गैरवापर करून मिळवला डेटा - DEEPSEEK AI

मायक्रोसॉफ्ट आणि ओपनएआयनं चीनी एआय डीपसीकवर गंभीर आरोप केलाय. डीपसीकनं ओपनएआयचा डेटा चोरल्याचा आरोप आहे.

DeepSeek
डीपसीक (AP News)

By ETV Bharat Tech Team

Published : Jan 30, 2025, 3:53 PM IST

हैदराबाद : चिनी एआय कंपनी डीपसीकवर ओपनएआयचा डेटा चोरल्याचा आरोप मायक्रोसॉफ्ट आणि ओपनएआयनं केलाय. मायक्रोसॉफ्टनं म्हटलं की, ते ओपनएआयच्या सहकार्यानं या प्रकरणाची चौकशी करणार आहे. अहवालानुसार, डीपसीकनं ओपनएआयच्या तंत्रज्ञानाशी संबंधित डेटा चुकीच्या पद्धतीनं मिळवल्याचा आरोप आहे.

संबंधित डाटाची चौकशी
या प्रकरणात मायक्रोसॉफ्टची एक चौकशी टीम तयार केली जाईल, जी डीपसीकशी संबंधित डाटाची चौकशी करण्याची शक्यता आहे. ओपनएआय ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीआय) चा गैरवापर करून डीपसीकनं मोठ्या प्रमाणात डेटा चोरल्याचा आरोप आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपरला त्याच्या ॲपमध्ये ओपनएआयशी संबंधित तंत्रज्ञान मिळविण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. ओपनएआयमधील सर्वात मोठी गुंतवणूकदार कंपनी मायक्रोसॉफ्टनं सांगितलं की डीपसीकनं या अटींचं उल्लंघन केलं आहे.

डीपसीक म्हणजे काय
डीपसीक ही एक चिनी एआय स्टार्टअप आहे. या एआय स्टार्टअपनं अलीकडंच त्यांचे लार्ज लँग्वेज मॉडेल (एलएलएम) व्ही३ लाँच केलं होतं. ते चॅटबॉटद्वारे त्यांच्या ग्राहकांना सेवा प्रदान करतंय. हे मॉडेल ओपनएआयच्या चॅटजीपीटीपेक्षाही चांगलं, असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

अलिबाबा सर्वोत्तम एआय मॉडेल आणल्याचा दावा
चिनी तंत्रज्ञान कंपनी अलिबाबानं बुधवारी त्यांच्या क्वान २.५ एआय मॉडेलची नवीन आवृत्ती २.५-मॅक्स लाँच केलीय. अलिबाबाचा दावा आहे की हे डीपसीक-व्ही३ मधील एआय मॉडेल आहे. अलिबाबाच्या क्लाउड युनिटनं म्हटले आहे की त्यांच्या क्वान २.५-मॅक्सनं जीपीटी-४ओ, डीपसीक-व्ही३ आणि लामा-३.१-४०५बी पेक्षा अधिक चांगलं आहे.

अमेरिकन कंपनी एनव्हीडिया
चीनी कंपनी डीपसीकच्या उदयामुळं अमेरिकन चिप उत्पादक एनव्हीडियाचं बाजार मूल्य ५९५ अब्ज डॉलर्सपेक्षा कमी झालं आहे. डीपसीकचा एआय चॅटबॉट ॲपलच्या स्टोअरमधून सर्वाधिक डाउनलोड केलेलं मोफत ॲप बनलं आहे. या ॲपची अल्पावधीतच चर्चा होण्याचे कारण म्हणजे ते यूएस-आधारित एआय कंपन्यांपेक्षा कमी खर्चात उपलब्ध आहे.

हे वचालंत का :

  1. नवीन म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजना काय आहे? १०० कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाची हमी
  2. अंतराळवीर सुनीता विल्यम्स आज नववा स्पेसवाक करणार, कुठ पहाणार लाईव्ह?
  3. ओला इलेक्ट्रिक जेन ३ प्लॅटफॉर्मवर आधारित नवीन इलेक्ट्रिक उद्या सादर करणार

ABOUT THE AUTHOR

...view details