ETV Bharat / technology

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आज नववा स्पेसवाक करणार, कुठ पहाणार लाईव्ह? - SUNITA WILLIAMS NINTH SPACEWALK

नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आज त्यांचा नववा स्पेसवाक अंतराळात करणार आहे. हा स्पेसवाक तुम्ही NASA+ वर लाईव्ह पाहू शकता.

Sunita Williams, Butch Wilmore
सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Jan 30, 2025, 1:26 PM IST

हैदराबाद : नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा स्पेसवॉकसाठी सज्ज आहेत. ही एक्स्ट्राव्हेहिक्युलर ॲक्टिव्हिटी (EVA) आज (३० जानेवारी) सुमारे ६.५ तास चालेल. सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या (ISS) कमांडर असलेल्या विल्यम्स, फ्लाइट इंजिनिअर बूच विल्मोर यांच्यासोबत असतील. अंतराळवीर आज संध्याकाळी ६६:३० वाजता त्यांचं स्पेससूट बॅटरी पॉवरवर स्विच करणार आहेत, ज्यामुळं स्पेसवॉकची अधिकृत सुरुवात होईल. NASA+ वर लाइव्ह कव्हरेज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५:०० वाजता सुरू होईल.

सर्वात अनुभवी महिला अंतराळवीर
विल्यम्स यांचा आजचा स्पेसवॉक हा नववा स्पेसवॉक असेल. यात त्या यशस्वी झाल्या तर त्या इतिहासातील सर्वात अनुभवी महिला स्पेसवॉकर बनतील. सध्या, पेगी व्हिटसन यांच्या नावावर महिला अंतराळवीर म्हणून सर्वाधिक वेळा अंतराळात चालण्याचा विक्रम आहे, त्यांनी एकूण १० वेळा ६० तास २१ मिनिटे अंतराळात चालण्याचा विक्रम केला आहे. अलीकडील स्पेसवॉकनंतर, विल्यम्स यांच्याकडं ५६ तास ४० मिनिटे अंतराळात चालण्याचा अनुभवल आहे. आजच्या स्पेकवानंतर त्या सर्वांचे विक्रम मोडीत काढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) दुरुस्ती मोहिमेचा भाग म्हणून, नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आज नववा स्पेसवॉक करणार आहेत. मात्र, ISS वरील मोहिमेदरम्यान अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना आरोग्यविषयक समस्यांकडं लक्ष देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामुळं शारीरिक ताण आणि प्रणालीत बदल होण्याची शक्यता जास्त असते.

डीकंप्रेशन सिकनेसचा धोका
स्पेसवॉकसाठी ISS च्या बाहेर जाण्यापूर्वी, विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर सारख्या अंतराळवीरांना काळजीपूर्वक तयारी करावी लागते. याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे विशेषतः डिझाइन केलेल्या एअरलॉक कंपार्टमेंटमध्ये शुद्ध श्वास त्यांना घ्यावा लागतो. यामुळं शरीरातून नायट्रोजन काढून टाकण्यास मदत होते, ज्यामुळे डीकंप्रेशन सिकनेसचा धोका कमी होतो, ज्याला "द बेंड्स" असंही म्हणतात. याबाबत नॉर्थम्ब्रिया विद्यापीठातील एरोस्पेस मेडिसिनच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. कर्स्टी लिंडसे अंतराळविरांच्या आरोग्यावर प्रकाश टाकला आहे. अचानक वातावरणातील बदलामुळं एअरलॉकमधून बाहेर पडल्यानं चक्कर येणे होऊ शकते, असं लिंडसे यांनी म्हटलं आहे.

विस्तारित अंतराळ उड्डाणांचे नुकसान
अंतराळ मोहिमांमुळं स्नायू शोष, हाडांची घनता कमी होऊ शकते. सध्या सुनीता विल्यम्सच्या यांचं वजन कमी झाल्याचं दिसून येतं, ज्यामुळं त्यांच्या एकूण आरोग्याबद्दल चिंता निर्माण होतेय. अंतराळात ऊर्जा पातळी टिकवून ठेवण्यासाठी अंतराळविरांना दुप्पट कॅलरीजची गरज असते, असं तज्ञांचं म्हणणे आहे.

हे वाचलंत का :

  1. फेब्रुवारी २०२५ मध्ये भारतात लाँच iQOO Neo 10R, realme P3 Pro सह 'हे' स्मार्टफोन, जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर
  2. जिओच्या व्हॉइस आणि एसएमएस-ओन्ली प्रीपेड प्लॅनपैकी कोणता सर्वोत्तम?
  3. Apple एप्रिलमध्ये Siri अपग्रेडसह iOS 18.4 लाँच करणार?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.