हैदराबाद : ओला इलेक्ट्रिक कंपनी ३१ जानेवारी रोजी जनरेशन ३ प्लॅटफॉर्मवर आधारित इलेक्ट्रिक स्कूटर सादर करणार आहे. यासोबतच, कंपनीनं सोशल मीडियावर इलेक्ट्रिक मोटरसायकलचा एक नवीन फोटो देखील शेअर केला आहे. दुचाकीचा शानदार लूक दिसून येतोय. जनरेशन ३ प्लॅटफॉर्मवर आधारीत ओलाचं इलेक्ट्रिक स्कूटर कसं असेल जाणून घेऊया...
Bringing the 'Next Level' with @OlaElectric Gen 3 scooters!
— Bhavish Aggarwal (@bhash) January 29, 2025
We’ve significantly surpassed Gen 2 products in every way - much higher performance, more features, great design! And a surprise to change the industry all over again 😉
10:30 AM Fri 31st Jan https://t.co/hHyiHt6KRe pic.twitter.com/mgsOxjLs2O
जनरेशन ३ प्लॅटफॉर्म
ओलाचा जनरेशन ३ प्लॅटफॉर्म अनेक उत्तम वैशिष्ट्यांसह येणार आहे. त्यात चुंबकविरहित मोटर दिसेल, जी पहिल्यांदाच वापरली गेली आहे, त्यामुळं स्कूटर पूर्वीपेक्षा जास्त टॉर्क जनरेट करेल. ओलानं दावा केला आहे की या नवीन मोटर्समुळं तिची कामगिरी सुधारेल. याव्यतिरिक्त, नवीन प्लॅटफॉर्ममध्ये सिंगल बोर्ड इलेक्ट्रॉनिक्स आणि स्ट्रक्चरल बॅटरी पॅक समाविष्ट आहे. आता बॅटरी पॅक केवळ उर्जेचा स्रोत राहणार नाही तर, त्यामुळं वाहनाची मजबूती आणि सुरक्षितता देखील सुधारेल.
ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम्स
बॅटरी सिस्टीममध्ये देशांतर्गत उत्पादित ४६८० बॅटरी सेल वापरल्या जातील, ज्यांची ऊर्जा घनता १० टक्के जास्त आहे. यासोबतच त्याची बॅटरी क्षमताही सुधारण्यात आली आहे. ओलाच्या जनरेशन ३ प्लॅटफॉर्ममध्ये आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा समावेश आहे. यामध्ये मल्टी-कोर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. ओलाचा दावा आहे की त्यांचा सेंट्रल कंप्यूट बोर्ड पॉवरच्या बाबतीत इतर कोणत्याही दुचाकी इलेक्ट्रॉनिक्स बोर्डपेक्षा चांगला आहे, जो ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम्स (ADAS) सारख्या वैशिष्ट्यांना सक्षम करण्यास मदत करेल.
ही आहेत वैशिष्ट्ये
ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ही मोटरसायकल पिवळ्या आणि काळ्या रंगात दिसत आहे. यात एलईडी डेटाइम रनिंग लॅम्पसह स्लिम हेडलॅम्प आणि प्रोजेक्टर सेटअप आहे. या इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये TFT स्क्रीन देखील दिसते. ही इलेक्ट्रिक बाईक MoveOS 5 वर चालेल, ज्यामध्ये Ola Maps, रोड ट्रिप मोड, स्मार्ट पार्क, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि व्हॉइस असिस्टंट सारखी वैशिष्ट्ये असतील.
'हे' वाचलंत का :