महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

चॅटजीपीटीची आता व्हॉट्सॲपवर व्हॉइस आणि इमेज सेवा सुरू - CHATGPT ON WHATSAPP NEW UPGRADES

WhatsApp वर ChatGPT ला नवीन अपडेट मिळताय. ChatGPT ची आता WhatsApp वर व्हॉइस आणि इमेज सेवा देखील मिळतेय.

Open AI
ओपन एआय (AP Photo)

By ETV Bharat Tech Team

Published : Feb 5, 2025, 5:23 PM IST

हैदराबाद :व्हॉट्सॲपवरील नवीन चॅटजीपीटी अपडेटची माहिती प्रथम अँड्रॉइड अथॉरिटीनं दिली. नवीन अपडेटनंतर, जर तुम्हाला एखाद्या इमेजमधील काही समजत नसेल किंवा इमेजवर लिहिलेला मजकूर कॉपी करायचा असेल किंवा त्या इमेजवर आधारित लेख लिहायचा असेल, तर ChatGPT तुमचे काम WhatsApp वरच करू शकते.

ChatGPT करतंय इमेजला सपोर्ट
ओपनएआयनं चॅटजीपीटी वापरकर्त्यांसाठी एक मोठं अपडेट जारी केलं आहे. काही महिन्यांपूर्वी WhatsApp वर ChatGPT उपलब्ध करून देण्यात आलं होतं. पूर्वी, WhatsApp फक्त ChatGPT मजकूर पाठवण्यास सपोर्ट करत होतं, परंतु आता ते इमेज आणि व्हॉइस इनपुटला देखील सपोर्ट करतंय, म्हणजेच आता तुम्ही ChatGPT ला इमेज पाठवून किंवा बोलूनही उत्तरं मिळवू शकता.

अँड्रॉइड अथॉरिटीनं दिली अपडेटची माहिती
व्हॉट्सॲपवरील नवीन चॅटजीपीटी अपडेटची माहिती प्रथम अँड्रॉइड अथॉरिटीनं दिलीय. नवीन अपडेटनंतर, जर तुम्हाला एखाद्या इमेजमधील काही समजत नसेल किंवा इमेजवर लिहिलेला मजकूर कॉपी करायचा असेल किंवा त्या इमेजवर आधारित लेख लिहायचा असेल, तर ChatGPT तुमचं काम WhatsApp वरच करू शकतं.

वैयक्तिक इमेजबाबत घ्या काळजी
इमेज प्रोसेसिंगसह, वापरकर्ते आता ChatGPT ला इमेजशी संबंधित कोणताही प्रश्न विचारू शकतात, अगदी मीम्सना रेट करण्यासही ते सांगू शकतात. तंत्रज्ञानाच्या मदतीनं, एआय दृश्य माहितीवर प्रक्रिया करण्यास आणि प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम आहे. प्रतिमा प्रक्रिया करण्यासाठी OpenAI सर्व्हरवर पाठवेल, म्हणून वैयक्तिक माहिती किंवा संवेदनशील सामग्री असलेल्या प्रतिमा पाठवू नये, हे सर्वांनी लक्षात ठेवावं.

चॅटबॉटशी करता येतो संवाद
त्याचप्रमाणे, व्हॉइस मेसेजेससह, वापरकर्त्यांना त्यांचे प्रश्न टाइप करण्याची आवश्यकता नाही. आता चॅटबॉट व्हॉइस मेसेज प्रोसेस करू शकणार असून टेक्स्ट स्वरूपात उत्तर देऊ शकणार आहे. डिसेंबरमध्ये, OpenAI नं ChatGPT साठी एक नवीन फोन नंबर जारी केलाय. +1-800-242-8478. या नंबरद्वारेच WhatsApp वर ChatGPT वापरता येईल. याशिवाय, कॅनडा आणि अमेरिकेत राहणारे वापरकर्ते त्यांच्या स्मार्टफोन किंवा फीचर फोनवरून या नंबरवर कॉल करून चॅटबॉटशी थेट बोलू शकतात.

हे वाचलंत का :

  1. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन एक्स प्लॅटफॉर्म एआय पीसी 24 फेब्रुवारीला भारतात होणार लाँच
  2. ओला रोडस्टर एक्स आणि रोडस्टर एक्स+ इलेक्ट्रिक बाइक्स लाँच केल्या, खरेदीवर मिळतेय 15 हजारांची सूट
  3. जगातील पहिला ट्रिपल फोल्ड फोन Huawei Mate XT 18 फेब्रुवारीला होणार लॉंच

ABOUT THE AUTHOR

...view details