हैदराबाद : ओला इलेक्ट्रिकनं त्यांच्या नवीनतम इलेक्ट्रिक मोटारसायकली, रोडस्टर एक्स आणि रोडस्टर एक्स प्लस लाँच केल्या आहेत. ज्यामध्ये 50 हून अधिक स्मार्ट फीचर्स आणि प्रगत तंत्रज्ञान देण्यात आलं आहे. या बाईकमध्ये क्रूझ कंट्रोल फीचर, 4.3-इंच कलर एलसीडी आणि अतिरिक्त सोयीसाठी रिव्हर्स मोड मिळतंय. दोन्ही मॉडेल्स पाच रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असतील.
खरेदीवर 15,000 रुपयांची सूट
ओला इलेक्ट्रिकनं रोडस्टर एक्स आणि रोडस्टर एक्स+ दुचाकी आज लाँच केल्या. या दुचाकी 501 किमी पर्यंतची रेंज, क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स मोड आणि स्मार्ट फीचर्सनं सुसज्ज आहेत. या दुचाकींची किंमती 75,000 रुपयांपासून सुरू होतेय. तसंच दुचाकी खरेदीवर मर्यादित कालावधीसाठी 15,000 रुपयांची सूट मिळतेय.
ओला रोडस्टर एक्सची वैशिष्ट्ये
ही दुचाकी तीन बॅटरी पॅकमध्ये उपलब्ध आहे. यात 2.5 किलोवॅट, 3.5 किलोवॅट आणि 4.5 किलोवॅट बॅटरी मिळेल.
रेंज : एका दुचाकी चार्ज केल्यानंतर 252 किमी पर्यंतची रेंज देते, असा दावा कंपनीनं केलाय.
एक्सीलरेशन : 3.1 सेकंदात ही दुचाकी 0-40 मैल प्रति तास वेगानं धावू शकते, असं कंपनीचं म्हणणं आहे.़
पॉवर आउटपुट : या दुचाकीचा 7 किलोवॅट पीक पॉवर आहे.
टॉप स्पीड : 118 किमी प्रति तास वेगानं रोडस्टर एक्स धावू शकते, असा कंपनीचा दावा आहे.
ओला रोडस्टर एक्स+ ची वैशिष्ट्ये
ही दुचाकी दोन बॅटरी पॅकनं सुसज्ज असून यात 4.5 किलोवॅट, 9.1 किलोवॅट बॅटरी मिळतेय.
रेंज : एका चार्जवर 501 किमी पर्यंत ही दुचाकी रेंज देते, असा दावा ओलानं केलाय. (1.1 किलोवॅट पॅकसह)
वेग : 2.7 सेकंदात 0-40 मैल प्रति तास ओला रोडस्टर एक्स+ धावू शकते.
पॉवर आउटपुट : 11 किलोवॅट पीक पॉवर या दुचाकीला मिळतोय
टॉप स्पीड : रोडस्टर एक्स+ 125 किमी प्रति तास वेगानं धावणार असून सुरक्षिततेसाठी यात फ्रंट डिस्क ब्रेक मिळतोय.
किंमत तपशील (१५,००० रुपयांच्या सवलतीनंतर)
रोडस्टर एक्स :
2.5 किलोवॅट – 75,000 रुपये
3.5 किलोवॅट तास – 85,000 रुपये
4.5 किलोवॅट तास – 95, 000 रुपये
रोडस्टर एक्स+:
4.5 किलोवॅट – 1.5 लाख रुपये
9.1 किलोवॅट तास – 1.55 लाख रुपये
दुचाकीवर मर्यादीत कालावधीसाठी 15,000 रुपयांची सवलत मिळतेय.
हे वाचलंत का :
- ओला रोडस्टर एक्स इलेक्ट्रिक मोटरसायकल उद्या होणार लाँच, जाणून घ्या काय असेल खास?
- जगातील पहिला ट्रिपल फोल्ड फोन Huawei Mate XT 18 फेब्रुवारीला होणार लॉंच
- आयफोन १५ बनला नंबर १, २०२४ मध्ये आयफोन १५ची सर्वाधिक विक्री, जाणून घ्या टॉप 10 सेल होणाऱ्या फोनची यादी
- आयफोनवर आलं पहिलं पॉर्न अॅप, अॅपलनं केली चिंता व्यक्त