हैदराबाद : BMW इंडियानं गुरुवारी 28 नोव्हेंबर रोजी भारतात अपडेटेड BMW M2 Coupe SUV कार लाँच केलीय. कंपनीनं ही स्पोर्ट्स कार 1.03 कोटी रुपयांना (एक्स-शोरूम) लाँच केली आहे. कंपनीनं डिझाईनमध्ये किरकोळ बदल आणि दोन नवीन रंग पर्यायांसह BMW M2 सादर केली आहे.
BMW M2 6-सिलेंडर ट्विन-टर्बो इंजिन :कंपनीनं अधिक शक्तिशाली 3.0-लिटर 6-सिलेंडर ट्विन-टर्बो इंजिनसह कार सादर केली आहे. बीएमडब्ल्यूचा दावा आहे की वाहन फक्त 4 सेकंदात 0 ते 100 mph पर्यंत वेग वाढवू शकते. भारतात या कारला थेट प्रतिस्पर्धी नाही, परंतु आकारमान आणि शक्तीमुळं ती मर्सिडीज-एएमजी ए 45 एस हॅचबॅकशी स्पर्धा करू शकते.
BMW M2 इंजिन क्षमता :2025 BMW M2 मध्ये 3.0-लिटर टर्बोचार्ज्ड इनलाइन-सहा-सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन473 bhp आणि 600 Nm टॉर्क (मॅन्युअलसह 550 Nm) निर्माण करतं. इंजिन मानक म्हणून 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी यात जोडलेले आहे. तसंच पर्यायी 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देखील ऑफर केले आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह कार केवळ 4 सेकंदात 0 ते 100 मैल प्रतितास आणि मॅन्युअलसह 4.2 सेकंदात वेग वाढवू शकतं. पूर्वीप्रमाणेच, पर्यायी M ड्रायव्हर पॅकेजसह, इलेक्ट्रॉनिकली मर्यादित टॉप स्पीड 250 kmph वरून 285 kmph पर्यंत वाढतं.