हैदराबाद : OnePlus नं एक नवीन फोन रिप्लेसमेंट प्लॅन जाहीर केला आहे. OnePlus 13 आणि OnePlus 13R या नविन लॉंच झालेल्या स्मार्टफोन्ससाठी ही ऑफर लागू आहे. यातील दोन्हीपैकी 13 फेब्रुवारी 2025 पूर्वी कोणताही एक फोन खरेदी करतील त्यांनाच या ऑफरचा लाभ मिळणार आहे.
मोफत रिप्लेसमेंट
एका प्रेस स्टेटमेंटमध्ये, OnePlus नं सांगितलं की, नवीन OnePlus 13 किंवा OnePlus 13R मध्ये हार्डवेअर समस्या आल्यास खरेदीच्या पहिल्या 180 दिवसांच्या आत मोफत रिप्लेसमेंट ग्राहकांना मिळणार आहे. यामुळं वापरकर्त्यांना हार्डवेअर समस्या उद्भवल्यास दुरुस्ती प्रक्रियेत आता जाण्याची गरज नाहीय. 180 दिवसांचा कालावधी म्हणजे तुम्ही जवळपास पाच महिन्यांपेक्षा अधिक काळ फोनचा वापर करून समस्या आल्यास रिप्लेस करु शकता.
180 दिवसांचा फोन रिप्लेसमेंट प्लॅन
"ही ऑफर देताना आम्हाला अभिमान वाटतोय. त्यामुळं ग्राकांचा अनुभव आणखी वाढेल," असं वनप्लस इंडियाचे सीईओ रॉबिन लिऊ म्हणाले. "वनप्लस 13 मालिकेसाठी 180 दिवसांचा फोन रिप्लेसमेंट प्लॅन आमच्या उत्पादनांच्या विश्वासार्हतेवर विश्वास दर्शवितो, स्थानिक ग्राहकांसाठी सेवेची गुणवत्ता आम्ही कायम चांगली ठेऊ, असं देखील ते म्हणाले."
कुठं मिळणार बदलून
ही एक्सचेंज प्रक्रिया एकदम सोपी असेल. ग्राहकांना रिप्लेसमेंट फोन मिळवण्यासाठी वनप्लसच्या अधिकृत सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल. 10 जानेवारी ते 13 फेब्रुवारी पर्यंत, वनप्लस 13 मालिका खरेदी करणाऱ्या कोणालाही ही सेवा मोफत दिली जाईल. या मोफत रिप्लेसमेंट ऑफर कालावधी संपल्यानंतर, ही प्रीमियम सेवा पर्यायी शुल्कासह उपलब्ध राहील. नंतर दोन्ही मॉडेल्ससाठी वेगवेगळ शुल्क आकारलं जाईल. OnePlus 13 ची किंमत 2599 रुपये आणि OnePlus 13R ची किंमत 2299 रुपये आहे, ही प्रीमियम प्रोटेक्शन सर्व्हिस प्लॅन सेवा आणखी तीन महिन्यांसाठी वाढवता येईल.
OnePlus 13 ऑफर
OnePlus 13 भारतात 69,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता, तर नवीन OnePlus 13R 42,999 रुपयांना बाजारात आला होता. फ्लॅगशिप मॉडेल 10 जानेवारी रोजी विक्रीसाठी उपलब्ध होईल. 13R आवृत्ती 13जानेवारी रोजी उपलब्ध होईल. OnePlus 13 5000 रुपयांच्या बँक डिस्काउंट ऑफरसह विक्रीसाठी उपलब्ध असेल आणि 13R 3000 रुपयांच्या बँक डिस्काउंट ऑफरसह विकला जाईल, ज्यामुळे या फोनची किंमत आणखी कमी होईल.
हे वाचलंत का :