हैदराबाद Bajaj 100cc CNG Motorcycle :देशांतर्गत वाहन उत्पादक बजाज ऑटो कंपनी पर्यायी इंधनामध्ये प्रयत्न करत आहे. यामुळं, एंट्री-लेव्हल कम्युटर सेगमेंट लक्षात घेऊन, कंपनी आता एक नवीन CNG मोटरसायकल विकसित करत आहे. कंपनी इथेनॉलवर चालणारी दुचाकी आणि तीनचाकी वाहने बाजारात आणण्यासाठी प्रयत्नशिल आहे. बजाज ऑटोचे सीईओ राजीव बजाज यांनी CNBC-TV18 ला दिलेल्या मुलाखतीत याची पुष्टी केलीय. कंपनी या वर्षी जुलैमध्ये बजाज फ्रीडम 125 CNG लाँच केल्यानंतर आपली CNG श्रेणी वाढवण्याचा विचार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
नवीन सीएनजी मोटरसायकल :फ्रीडम 125 सीएनजी लॉन्च करताना, बजाज ऑटोनं 100cc सेगमेंटला लक्ष्य करत सीएनजी मोटरसायकल रेंजचा विस्तार करण्याचा आपला इरादा जाहीर केला होता. हिरो स्प्लेंडरनं एंट्री-लेव्हल कम्युटर सेगमेंटवर वर्चस्व कायम राखलं असताना, बजाज स्वतःच्या 100cc CNG मोटरसायकलसह हिरोला आव्हान देण्याची तयारी करत आहे. Hero Splendor+ ची किंमत 75,441 रुपये आहे. एक्स-शोरूम, बजाजच्या नवीन 100cc CNG मोटरसायकलला या सेगमेंटमध्ये लक्षणीय एंट्री करण्यासाठी स्पर्धात्मक किंमतीसह ऑफर देणं आवश्यक आहे. आत्तापर्यंत, बजाज ऑटोनं या मोटरसायकलची लॉन्च टाइमलाइन उघड केलेली नाही.