हैदराबाद Google internship 2025 :गुगलमध्ये नोकरी मिळवणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. जर तुम्हालाही गुगलसोबत तुमचं करिअर सुरू करायचं असेल, तर कंपनी तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आली आहे. Google नं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग विंटर इंटर्न 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, इंटर्नशिप जानेवारी 2025 पासून सुरू होईल. या इंटर्नशिपचा कालावधी 22 ते 24 आठवडे असेल. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी त्यांची पात्रता तपासून अर्ज करावे.
इंटर्नशिपसाठी कोण करू शकतो अर्ज: या इंटर्नशिपमध्ये सहभागी होण्यासाठी, विद्यार्थ्यांनी पदवीपूर्व, पदव्युत्तर पदवी अंतिम वर्षात शिकत असला पाहिजे. C, C++, Java, JavaScript, Python किंवा त्याच्या समकक्ष सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि कोडिंगचा अनुभव यासाठी लगणार असावा. अधिक माहितीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
इंटर्नशिपसाठी कसा करावा अर्ज : Google इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला प्रथम अधिकृत पोर्टलवर (https://buildyourfuture.withgoogle.com/internships) जावं लागेल. इथं तुम्हाला Apply ची लिंक दिसेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. यानंतर, आवश्यक तपशील भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. अर्जासोबत, तुम्ही तुमचा सीव्ही देणं आवश्यक आहे.