ETV Bharat / state

पॅकेजिंगच्या व्यवसायात गुंडाळला कायदा; गोदामात मजुरी करणाऱ्या ९ बालकामगारांची सुटका - THANE CRIME

ठाणे जिल्ह्यात मुलांना मजूर म्हणून काम करायला लावल्याप्रकरणी पोलिसांनी कंपनी मालकावर २० डिसेंबरला गुन्हा दाखल केला. फरार झालेल्या कंपनीच्या मालाकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Thane crime 9 child labor rescue
बालकामगारांची सुटका (Source-E TV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 6 hours ago

ठाणे - नफेखोरीकरिता लहान मुलांकडून मजुरी करून घेण्याचे ठाणे जिल्ह्यात 'उद्योग' सुरू असल्याचं पुन्हा एकदा भिवंडीत समोर आलं आहे. भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदामात अल्पवयीन मुलांना कामावर ठेवल्याची घटना वेहळे गावात उघडकीस आली. सामाजिक संस्थांच्या सक्रियतेमुळे पोलिसांनी छापा टाकून ९ अल्पवयीन मुलांची सुटका केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,लोढा अप्पर ठाणे बिल्डिंग टीआरएच्या फ्लॅट क्रमांक ४०३ मध्ये राहणारे रामा सुतार यांचा पॅकेजिंगचा व्यवसाय आहे. त्या ठिकाणी बाल कामगारांकडून काम करून घेतले जात होते. गोदामात १२ ते १७ वर्षे वयोगटातील ९ मुलांना इलेक्ट्रॉनिक वस्तू पॅकिंगसाठी ठेवण्यात आल्याचं छाप्या दरम्यान निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आई फाऊंडेशनचे ठाणे जिल्हा प्रमुख राजेश दत्ताराम दखिनकर आणि अखिल भारतीय सेना यांनी भिवंडी सहायक कामगार आयुक्त कार्यालयात तक्रार केली होती.

९ मुलांची सुटका- रामा सुतार यांच्या वेहळे येथील राजेश्वरी लॉजेस्टीक पार्क नावाच्या गोदाम क्र.७२५ मधील गाळा क्र.१०७ ते ११० या ठिकाणी नारपोली पोलिस, जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, सहाय्यक कामगार आयुक्त भिवंडी आदींच्या संयुक्त पथकानं २० डिसेंबर रोजी दुपारी साडे बारा वाजता घटनास्थळी छापा टाकला. छाप्यादरम्यान सर्व मुलांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले.

ठोस पावले उचलावीत- सुटका करण्यात आलेल्या मुलांची योग्य काळजी आणि पुनर्वसन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नारपोली पोलिसांनी नागरिकांना बालमजुरीसारख्या अमानुष कृत्याची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिस किंवा संबंधित विभागाला कळवावे, असे आवाहन केले आहे. बालकामगार कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही पोलीस प्रशासनानं सांगितलं आहे. या घटनेमुळे भिवंडीतील बालहक्क आणि कामगार कायद्याच्या पालनावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि मुलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.

  • पोलिसांनी आरोपी मालक रामाराम सुतार याच्याविरुद्ध बालकामगार कायदा आणि इतर अनुषंगिक कलमान्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच गोदाम मालक फरार झाला. आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा-

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.